आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लामा यांना चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांकडून अनेकवेळा देणग्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग  - तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांना चीन पाण्यात पाहत आले आहे. मात्र सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीतील काही पदाधिकाऱ्यांनीच त्यांना अनेकवेळा देणगी दिली होती, असा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राने केला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने पहिल्यांदाच या गोष्टीची कबुली दिली आहे.  

सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या मते एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने तिबेटचे निर्वासित अाध्यात्मिक गुरूंना देणगी देणाऱ्या पदाधिकाऱ्यांंना खडे बोल सुनावले आहेत. ग्लोबल टाइम्सने तिबेटमधील अधिकारी वाँग याँग्जून यांच्या हवाल्याने हा दावा केला. यासंबंधीचा लेख सोमवारी प्रकाशित झाला. काही पदाधिकारी पक्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे कानाडोळा करू लागले आहेत. त्यामुळे पक्षाच्या विरोधातील कारवायांमुळे संघटना कमकुवत होत आहे, असे वाँग यांचे म्हणणे आहे.   
 
२०१४ मध्ये पक्षाचे १५ पदाधिकारी परदेशी बंडखोर संघटनांच्या संपर्कात होते. या संघटना दलाई लामांना गुप्त माहिती देत होते. वाँग यांनी देणगीदार पदाधिकाऱ्यांची नावे मात्र जाहीर केली नाहीत. दलाई लामा १९५९ मध्ये भारतात आले होते. त्यानंतर चीनमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या असलेल्या संबंधाचा गौप्यस्फोट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, दलाई लामांनी दक्षिण तिबेटला भेट दिली होती. त्याला चीनने तीव्र आक्षेप घेतला होता. त्यावरून संतापलेल्या चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा जागांचे नामांतरही करून टाकले होते. भारताने ते नाकारले होते. 
 
तिबेटसाठी अनेक बळी  
 गेल्या काही वर्षांत स्वतंत्र तिबेटसाठी तीव्र आंदोलने पाहायला मिळाली. त्यात  आत्मदहनांच्या घटनांत १२० जणांचा मृत्यू झाला.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...