आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेट पेपरअभावी विमानाला विलंब, प्रवाशांना द्यावी लागणार तब्बल 2.36 कोटींची भरपाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लंडन - उड्डाणाच्या आधी टॉयलेट पेपर नसल्याचा प्रकार ब्रिटिश एअरवेजला चांगलाच महागात पडला आहे. त्यामुळे फक्त उड्डाणालाच विलंब झाला असे नव्हे, तर या चुकीसाठी कंपनीला सुमार २.३६ कोटी रुपयांची (२.९० लाख पौंड) भरपाईही द्यावी लागेल. एवढेच नव्हे तर सोशल मीडियातही कंपनीची खिल्ली उडवली जात आहे.  

ब्रिटिश एअरवेजचे विमान रविवारी दुपारी १.४० मिनिटांनी लंडनहून बार्बाडोसला रवाना होणार होते, काही कारणांमुळे उड्डाणाला विलंब होत असल्याचे प्रवाशांना एेनवेळी सांगण्यात आले. प्रत्येक वेळी विलंबाची कारणे वेगवेगळी सांगण्यात आली. एका प्रवाशाने सांगितले की, स्वच्छतेशी संबंधित काही समस्या आहे, लवकरच विमान रवाना होईल, असे मला सांगण्यात आले. त्याच वेळी अॅनाबेलने ट्विट केले. तिने लिहिले की, ‘उड्डाणाला विलंब होत आहे. हेडफोनमध्ये काही गडबड असल्याचे म्हटले जात आहे. टॉयलेट रोलही नाही.’ काही वेळाने दुसरे ट्विट केले, ‘टॉयलेट रोल आला आहे, प्रवासी विमानात परतले आहेत. चार तास विलंब झाला आहे. आणखी किती वेळ लागणार हे अजूनही माहीत नाही.’ बिल मरे या आणखी एका प्रवाशाने ट्विट केले, ‘यापेक्षा लज्जास्पद काय असेल? ब्रिटिश एअरवेजचे कॉस्ट कटिंग या मर्यादेपर्यंत पोहोचले आहे की आता कंपनीजवळ टॉयलेट रोलचा साठाही नाही. आता आम्हाला विमानात टॉयलेट रोलची कमतरताही सहन करावी लागेल.’ पॉल कॉयने लिहिले, ‘ते टॉयलेट रोल विसरले आहेत हे ऐकून हसू येत आहे.’ एअरवेज कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘काही अत्यावश्यक वस्तू वेळेत विमानात ठेवल्या जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे उशीर झाला. त्याचा आम्हाला खेद वाटतो. आम्ही प्रवाशांची संपूर्ण काळजी घेतली. 
 
विलंबासाठी ४८ हजार भरपाई
उशीर झाल्यास युरोपच्या कंपन्यांसाठी विशेष कायदा आहे. त्यानुसार, उड्डाणाला विलंब झाला तर एअरवेज कंपनीला प्रत्येक प्रवाशाला सुमारे ४८,७५० रुपये दंड द्यावा लागते. म्हणजे, ब्रिटिश एअरवेजला दोन्ही बाजूंच्या उड्डाणांसाठी सुमारे २.३६ कोटी रु. चा दंड द्यावा लागेल.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...