आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरारांसह 46 अॅटर्नी यांना राजीनामा देण्याचे आदेश, ट्रम्प प्रशासनाची कार्यवाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सरकारी वकील प्रीत भरारा यांच्यासह इतर ४५ अॅटर्नींनी  तत्काळ राजीनामा देऊन बाहेर पडण्याचे तडकाफडकी आदेश ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. बराक आेबामा यांच्या कार्यकाळात या सर्व अॅटर्नींची नेमणूक करण्यात आली होती.
 
बराक आेबामा यांच्या कार्यकाळात ९३ अॅटर्नींची नेमणूक करण्यात आली होती. त्यापैकी बहुतेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु ट्रम्प प्रशासनाचे सुरुवातीचे काही आठवडे उलटूनही ४६ अॅटर्नींनी पद सोडलेले नव्हते. अशा प्रकारची विनंती यापूर्वी जॉर्ज डब्ल्यू बुश व बिल क्लिंटन प्रशासनाने केली होती. सरकारच्या कारभाराच्या सुरुवातीला हे आदेश दिले गेले होते.  भारतीय वंशाच्या न्यूयॉर्कच्या अॅटर्नी प्रीत भरारा यांनाही पद सोडण्याची सूचना देण्यात आली आहे. आेबामा यांनी २००९ मध्ये भरारा यांची नियुक्ती केली होती. नोव्हेंबरमध्ये भरारा यांनी ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यावरून भरारा यांना पदावर राहता येईल, अशा अटकळी लढवल्या जात होत्या. परंतु ४८ वर्षीय भरारा यांना पद सोडावे लागणार आहे.  
अनपेक्षित आदेश  न्यूयॉर्कचे सिनेटर चार्ल्स शुमर म्हणाले, उर्वरित अॅटर्नींना पद सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात भरारा यांचे नाव आल्याने वाईट वाटले. वास्तविक नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मला बोलावून भरारा यांना पदावर कायम राहता येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांच्या आश्वासनाला ते जागले नाहीत. सरकारने उर्वरित सर्व अॅटर्नींना तत्काळ पद सोडण्यास सांगितले आहे. सिनेटर डिएन फिन्स्टिन यांनीदेखील ट्रम्प यांचा निर्णय अचानक असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी अगोदरही घेतलेले काही निर्णय मागे घेतले आहेत. त्यामुळे अगोदर घाईत निर्णय घेणारे ट्रम्प नंतर आपलाचा निर्णय बदलतात. 
बातम्या आणखी आहेत...