आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांचे अपील कोर्टाने फेटाळले, मुस्लिमांना अमेरिकेत अध्यादेशाद्वारे केली होती प्रवेशबंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जगातील सात मुस्लिमबहुल देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशासाठी निर्बंध लादणाऱ्या अध्यादेशाला फेडरल कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशावर केलेले अपीलही वरिष्ठ न्यायालयाने फेटाळले आहे. नवनियुक्त अध्यक्ष ट्रम्प यांना या प्रकरणात हा दुसरा मोठा झटका आहे.

ट्रम्प यांनी या सात देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास ९० दिवसांसाठी बंदी घालणारा अध्यादेश काढला होता. यावर सिएटल येथील फेडरल कोर्टाने स्थगिती आदेश दिला आहे. न्या. जेम्स रॉबर्ट यांनी संपूर्ण देशभरात या अध्यादेशाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठवण्यात यावी यासाठी व्हाइट हाऊसने सॅन फ्रान्सिस्कोतील ९व्या सर्किट अपील कोर्टात अपील केले होते. व्हाइट हाऊसच्या वकिलांनी न्यायालयात यावर केलेला युक्तिवाद फेटाळण्यात आला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...