आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इसिसच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे तुर्कीच्या मजबूत अर्थव्यवस्थेला पडले खिंडार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल- २८जून रोजी इस्तांबुलच्या अतातुर्क विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवर आयएसआयएसची छबी दिसून येत आहे. तुर्कीचे पंतप्रधान बिनाली यिलड्रीम यांनी हल्ल्यानंतर त्वरित सांिगतले होते की, सर्व पुरावे दाएशकडे (आयएसचे तुर्कीतील नाव) इशारा करीत आहेत. हा हल्ला आयएसच्या विरुद्ध युद्धाची नवी आघाडी उघडण्याची सुरुवात होऊ शकते. सिरिया आणि इराकमध्ये आयएसला अनेक िठकाणी पराभव पत्करावा लागला आहे. ते मध्य पूर्व, युरोप आणि दुसऱ्या िठकाणांवरील नागरिकांवर हल्ले करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या अभियानाचे मुख्य लक्ष्य तुर्की बनले आहे. गेल्या एका वर्षात तुर्कीमध्ये आयएसचा नागरिकांवर हा पाचवा हल्ला आहे. तीन मुखवटे घातलेल्या दहशतवाद्यांनी ४१ लोकांचे प्राण घेतले होते आणि २०० पेक्षा जास्त जखमी झाले होते. हल्ल्यांनी तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का दिला. ऐतिहासिक रूपाने स्थिर असलेल्या तुर्कीला इराक आणि सिरियामधून निर्माण झालेल्या क्षेत्रीय संघर्षात ओढल्या जात असल्याचे हे संकेत आहेत. इस्तांबुल विमानतळ हल्ल्याने पॅरिस, ब्रुसेल्स हल्ल्यांची आठवण करून िदली. हे तुर्कीच्या असैनिक पायाभूत सुविधा आणि त्याच्या महानगरीय चरित्राच्या मनावर हल्ले आहेत. अतातुर्क विमानतळ मध्यपूर्व, युराेप आणि आशियाच्या शहरांना जोडतो. याचा उपयोग सिरिया, इराक जाणारे आयएसचे पश्चिमी समर्थकांच्या ने -आण साठी होत आहे, हे दुर्दैवच आहे. तुर्कीमध्ये आयएसचे हल्ले वर्षभर आधी वाढले आहेत. जेव्हा जुलैमध्ये सीमाई शहरात सुरूकमध्ये बॉम्बस्फोटात ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. आॅक्टोबरमध्ये आत्मघाती हल्लेखोराने एका शांतता रॅलीवर हल्ला करून १०३ लोकांचे प्राण घेतले होते. हा आधुनिक तुर्कीच्या इतिहासातील सर्वात भीषण हल्ला होता. जानेवारी, मार्चमध्ये इस्तांबुलच्या पर्यटन जिल्ह्यांना लक्ष्य करण्यात आले होते. सिरियाचे राष्ट्रपती बशर असदद्वारा विरोधकांविरुद्ध सुरू केलेल्या अभियानामुळे सिरियामधून स्थलांतर होत आहे. जेहादी गटांसाठी शरणार्थी इंधनाचे काम करीत आहेत. २७ लाख सिरियाई स्थलांतरितांना शरण दिल्यानंतर आणखी लोकांना स्वीकारण्यास तुर्कीने नकार दिला आहे. दुसरीकडे आयएसने तुर्कीमध्ये मजबूत नेटवर्क तयार केले आहे. काही महिन्यांपासून जेहादींनी असद सरकार आणि आयएसविरोधी सिरियाई एक्टिविस्टांविरुद्ध भूमिगत अभियान सुरू केले आहे. ऑक्टोबरमध्ये संशयित आयएस सदस्यांनी सिरियात आयएसच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांचे गळे कापले होते. एप्रिलमध्ये गाजियांटेप शहरात अन्य एका कार्यकर्त्याची हत्या केली होती.

दुसरीकडे, तुर्की सरकारने सिरियामध्ये आयएसच्या स्थळांवर बॉम्बवर्षाव सुरू केला आहे. यापूर्वी ते तुर्कीकडून जाणाऱ्या आयएस जेहादींकडे फारसे लक्ष देत नव्हते. टीकाकारांनी राष्ट्रपती रेसेप तैयिप एर्दोगानच्या सरकारवर जिहादी अभियान रोखण्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या नसल्याचा अाराेप केला आहे. ऑक्टोबरमध्ये अंकारा हल्ल्यानंतर पोलिसांनी अदियामन शहरातील कट्टरपंथीयांवर फास आवळला होता. मानवाधिकार कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांचे म्हणणे होते की, त्यांनी अंकारा हल्ल्यांपूर्वी अदियामन गटाविषयी पोलिसांना सूचना दिली होती. सिरिया, इराकमध्ये अनेक आघाड्यांवर पराभूत झाल्यानंतर आयएसने नागरिकांवर हल्ल्यांच्या माध्यमातून पुन्हा रुळावर येण्याचा प्रयत्न केला आहे. कार्नेगी युरोप थिंक टँकचे विशेष तज्ज्ञ सिनान उलजेन यांचे म्हणणे आहे की, आयएस जगाला संदेश देत आहे की, ते सक्रिय आहेत. दुसरीकडे तुर्कीने शेजारी देशांपासून वेगळे राहण्याचे धोरण सोडण्याचे संकेत िदले आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये तुर्कीद्वारे रशियन फायटर जेट पाडल्यानंतर प्रथमच २९ जून रोजी एर्दोगानने रशियन राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. तुर्की आणि इस्रायलने अनेक वर्षांच्या तणावानंतर २८ जूनला द्वीपक्षीय संबंध कायम केले आहेत.

युरोपात तिसऱ्या क्रमांकावरील व्यग्र अतातुर्क विमानतळ, इस्तंबूलवर हल्ल्याने तुर्कीच्या पर्यटन उद्योगांवर आघात केला आहे. पर्यटनाशी संबंधित काही आकड्यांवर नजर टाकूया.
कोटी ७०लाखविदेशी पर्यटक २०१४ मध्ये तुर्कीत आले. या वर्षी ही संख्या ४० % कमी होऊ शकते.
९२% कपातझाली २०१५ मध्ये रशियन पर्यटकांच्या संख्येत. रशियन पर्यटकांसाठी तुर्की प्रमुख पर्यटनस्थळ आहे.

६७०अब्जरुपयांची घट येण्याची शक्यता आहे २०१६ मध्ये पर्यटनाच्या उत्पन्नात. १२ पैकी एक तुर्क देशाच्या पर्यटन उद्योगाशी जुळलेला आहे.
बातम्या आणखी आहेत...