आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी लष्कराचे विमान कोसळले, 16 जणांचा मृत्यू; विमानाचे अवशेष महामार्गावर दुतर्फा विखुरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन  - अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये लष्कराच्या विमानाला अपघात झाला असून त्यात १६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्व नौदलाचे सैनिक होते. घटनेत नागरिकाच्या मृत्यूचे वृत्त नाही. पेट घेतलेले विमान हेलकावे घेत जमिनीवर आले. विमानातील काही मृतदेह कोसळलेल्या ठिकाणापासून मैलभर अंतरावर आढळून आले. त्यावरून घटनेची भीषणता लक्षात येते.  
 
अमेरिकेचे हे विमान सायंकाळी ४ च्या सुमारास कोसळले. केसी-१३० विमानाला मिसिसिपी प्रांताची राजधानी जॅक्सनपासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर अपघात झाला. दुर्घटनेनंतर आगीचे डोंब आणि धुराचे मोठे लोट पाहायला मिळाले. त्याला विझवण्यासाठी सुमारे ४ हजार गॅलन फोमचा वापर करावा लागला. विमान कोसळण्यापूर्वीच त्याचा हवेत स्फोट झाला होता. त्यानंतर जमिनीवर त्याचा ढिगारा दोन ठिकाणी दिसून आला होता. विमानाचे अवशेष महामार्गावर दुतर्फा विखुरल्याचे दिसून आले. केसी-१३० हे विमान मालवाहू स्वरूपाचे होते. इंधन पुरवठा करणे आणि वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यावर होती.  लष्कराचे विमान सोयबीनच्या शेतात पडले. त्यासंबंधीच्या छायाचित्रात विमान पडलेल्या ठिकाणी काळ्या धुराचे लोट आकाशात दिसून येतात. सोमवारी सायंकाळी विमानाला अपघात झाला. घटनेचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.  
 
९२ सैनिकांना वाहून  नेण्याची क्षमता  
लष्कराचे हे विमान हवेत इंधन पुरवठ्याचा कामी वापरले जात होते. त्याशिवाय काही देशांतर्गत मदतकार्यातदेखील त्याचा वापर केला जात. विमानाची ९२ सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता होती.  
 
२० हजार फुटांवर झाला स्फोट  
केसी-१३० विमान स्फोटकांनी भरलेले होते. विमानाच्या दुर्घटनेमागील प्राथमिक कारणांचा शोध सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते विमान २० हजार फुट उंचीवर असताना त्यात स्फोट झाल्याचा अंदाज आहे.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, मोठ्ठा आवाज ऐकला...
बातम्या आणखी आहेत...