आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-चीन संबंध 100 दिवसांत बळकट करणार, ट्रम्प-जिनपिंग यांच्यात कार्ययोजनेवर सहमती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका,चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी शनिवारी मीडियाशी संवाद साधला. - Divya Marathi
अमेरिका,चीनच्या राष्ट्रप्रमुखांनी शनिवारी मीडियाशी संवाद साधला.
पाम बीच  - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दोन कामे एकाच वेळी केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे स्वत: हजर राहून स्वागत केले. अनेक मुद्द्यांवर चर्चा केली व सिरियावर क्षेपणास्त्र हल्लेही करून टाकले. चीनने सिरियावरील हल्ल्याचा विरोध केला, परंतु अमेरिकेसोबत व्यापारी संबंध सुधारण्यावरही भर दिला. उभय नेत्यांनी संबंध बळकट करण्यासाठी एक कार्ययोजना तयार करण्यात आली आहे. जिनपिंग यांनी ट्रम्प यांना चीन भेटीचे निमंत्रणही दिले. ट्रम्प यांनी ते स्वीकारले.   

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे रिसोर्ट  मार-ए-लागोमध्ये उभय देशांचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांच्याही भेटी झाल्या. दोन्ही नेत्यांमधील चर्चा सकारात्मक राहिली, अशी माहिती वाणिज्यमंत्री विल्मबर रॉस यांनी दिली. जिनपिंग यांनी उत्तर कोरियास अणू कार्यक्रम थांबवण्यास सांगावे. त्याचबरोबर अमेरिका-चीनमधील व्यापारी क्षेत्रातील नुकसान कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, असे प्रारंभी चर्चेत ट्रम्प यांनी सांगितले. चर्चेनंतर जिनपिंग म्हणाले, आम्ही परस्परांतील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले. जागतिक शांततेसाठी त्या दिशेने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये आम्ही आमची ऐतिहासिक
जबाबदारी आेळखून आहोत.   
 
या क्षेत्रात सहमती : सायबर सुरक्षा, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक सहकार्य वाढवण्यात ट्रम्प-जिनपिंग यांनी सहमती दर्शवली आहे. 
 
व्यावहारिक संबंधाला अधिक महत्त्व
- आम्ही परस्परांना समजून घेतले, परस्परांच्या पसंत-नापसंतीचा विचारही केला. अनेक मुद्द्यांवर सहमती झाली. त्यामुळे व्यावहारिक पातळीवर चांगले संबंध प्रस्थापित झाले.- शी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष, चीन 
 
क्षेपणास्त्र हल्ल्याचा परिणाम नाही  
चीनने सिरियावर अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यास विरोध केला आहे. परंतु ट्रम्प व जिनपिंग यांच्यातील चर्चेवर त्याचा परिणाम झालेला दिसून आला नाही. मात्र जिनपिंग अमेरिकेच्या दाैऱ्यावर असतानाच झालेल्या सिरियावरील हल्ल्यामुळे उभय नेत्यांमधील चर्चा रद्द होईल, अशा अटकळी लावल्या जात होत्या.   
 
उत्तर कोरियाचे मन चीन वळवणार  
उत्तर कोरियाचा अणू कार्यक्रम गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे, ही बाब चीनने मान्य केली आहे. उत्तर कोरियावर अंकुश लावणे गरजेचे बनले आहे. सुरक्षा परिषदेच्या सर्व प्रस्तावांची अंमलबजावणी व्हायला हवी. त्यासाठी चीन अणू कार्यक्रम बंद करण्यासाठी उत्तर कोरियाचे मन वळवेल, असे आश्वासन जिनपिंग यांनी ट्रम्प यांना दिले.  
 
सर्वात मोठे व्यापारी भागीदार : चीन अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांत ५१९.६ अब्ज डॉलर्सची (सुमारे ३३, ४०० अब्ज रुपये) व्यापारी उलाढाल झाली होती. १९७९ मध्ये ही उलाढाल केवळ २.५ अब्ज डॉलर्सची (सुमारे १६०.७० अब्ज रुपये) होती.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...