आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशेलअगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आेबामांचा दुसऱ्या महिलेला प्रेमप्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा पूर्वायुष्यात एका दुसऱ्याच महिलेच्या प्रेमात पडले होते. एवढेच नव्हे, तर मिशेल यांच्या भेटीअगोदर त्यांनी त्या महिलेला प्रेमप्रस्तावही दिला होता. परंतु हे नाते जुळले नाही. पुढे त्यांचा विवाह मिशेल यांच्याशी झाला, असा दावा त्यांच्या आगामी चरित्र ग्रंथातून करण्यात आला आहे.  

‘रायझिंग स्टार : द मेकिंग ऑफ बराक आेबामा ’ या पुस्तकाचे लेखक डेव्हिड जे गॅरो आहे. त्यांच्या पूर्वायुष्यातील अनेक धक्कादायक प्रसंगांना पुस्तकातून मांडण्यात आले आहे. आेबामांच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या महिलेचे नाव शीला मियोशी जॅगर असे आहे. शिकागोमध्ये त्यांच्यातील प्रेम फुलत होते. ही गोष्ट १९८६ ची. आेबामांनी प्रेमप्रस्ताव ठेवतानाच जॅगर यांच्या पालकांचीही भेट घेतली. परंतु जॅगर यांच्या आई-वडिलांनी विवाहासाठी नकार दिला. यासंबंधी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये पुस्तक परिचय प्रकाशित झाला आहे.   
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...