आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिएतनामला क्षेपणास्त्रे दिल्यास गप्प बसणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
बीजिंग - व्हिएतनामला गुपचूप क्षेपणास्त्रे विकण्याचा भारताने प्रयत्न केल्यास चीन गप्प बसणार नाही. प्रादेशिक पातळीवर ‘अस्थिरता’ निर्माण होऊ शकते, असा इशारा चिनी प्रसारमाध्यमांनी भारताला दिला आहे.  

भारत व्हिएतनामला आकाश क्षेपणास्त्रे विकण्याच्या तयारीत आहे. तशी योजना आहे. भारताने अशा प्रकारे व्हिएतनामशी लष्करी भागीदारी वाढवल्यास त्याचा चीनला फटका बसू शकतो. कारण व्हिएतनाम चीनशी असलेले वैर आणखी धारदार करू शकतो. त्यातून केवळ प्रादेशिक पातळीवर अस्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताने हा शस्त्र व्यवहार सर्वसामान्य असल्याचा दावा केला आहे. परंतु अणुपुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वास भारताला आक्षेप घेतल्याच्या रागातून भारताने हा निर्णय घेतला आहे, असे चिनी प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. परंतु भारताने अशा हालचाली केल्यानंतर चीन सरकार गप्प बसणार नाही, असे एका चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे. त्याचबरोबर भारत-व्हिएतनाम यांच्यात गुप्त पातळीवर यासंबंधीची चर्चा सुरू आहे, असा दावाही चीनने केला आहे. सर्व देशांसोबत चांगले संबंध ठेवणे किती महत्त्वाचे ठरू शकते याची भारताला पुरेपूर जाणीव आहे. अन्यथा काही चूक झाल्यास इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. स्वत:साठीदेखील ते अडचणीचे ठरू शकते. त्यातून भारताला विकासाच्या अनेक संधी गमवाव्या लागू शकतील, असा इशाराही चीनने दिला आहे.
 
दक्षिण चिनी सागरातील वाद  
दक्षिण चिनी सागरातील वादग्रस्त बेटांवरून चीन व व्हिएतनाम यांच्यात संघर्ष सुरू आहे. चीनने काही बेटांवर आपला हक्क सांगितला आहे. त्याला व्हिएतनामसह अनेक देशांना तीव्र विराेध दर्शवला आहे. चीनने आक्रमक भूमिका घेताना अनेक बेटांवर बांधकाम केले आहे. काही बेटांवर शस्त्रेदेखील तैनात करण्यात आली आहेत. व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई, तैवान यांनी चीनच्या भूमिकेला विरोध केला आहे.