आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

“पळपुट्या’ विजय मल्ल्या प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी 13 जूनपर्यंत टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- एसबीआयसह १७ बँकांचे नऊ हजार कोटी रुपये घेऊन पळालेल्या “पळपुट्या’ विजय मल्ल्याला इंग्लंडमधून प्रत्यार्पण करण्यासंबंधीची सुनावणी १३ जूनपर्यंत टळली आहे. याआधी याच महिन्यात १७ मे रोजी याप्रकरणी सुनावणी होणार होती. इंग्लंडमधील “क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिस’च्या (सीपीएस) प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. 

सीपीएस १३ जून रोजी लंडनमधील “वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स’ न्यायालयात भारतीय संस्थांची बाजू मांडतील. सीबीआय आणि प्रवर्तन निदेशालय (ईडी)चे चार सदस्य याच महिन्याच्या सुरुवातीला लंडनमध्ये पोहोचले आहेत.  सीबीआय आणि ईडीच्या वतीने देण्यात आलेल्या  माहितीच्या आधारे सीपीएस बाजू मांडणार आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हे चार सदस्य येथे आलेले आहेत. मल्ल्याच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सवर विविध बँकांची ९००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची थकबाकी आहे. ६१ वर्षीय मल्ल्या गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडमध्ये राहत आहे. स्कॉटलंड यार्डने गेल्या महिन्यातच फसवणुकीच्या आरोपात मल्ल्याला अटक केली होती. त्यानंतर इंग्लंडमधील न्यायालयात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...