आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धग्रस्त दक्षिण सुदानमधील युनिटी प्रांतात दुष्काळ जाहीर, देशातील 50 लाख लोकसंख्या भुकेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 झुबा- जगभरात ६ वर्षांनंतर कुठेतरी भीषण दुष्काळ जाहीर झाला आहे. तेदेखील जगातील सर्वात नवा देश दक्षिण सुदानच्या युनिटी प्रांतात. सरकारने सोमवारी दुष्काळाची घोषणा करताना सांगितले की, ३ वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे हा दुष्काळ पडला आहे. देशाची ५० लाख एवढी लोकसंख्या भुकेली आहे. एक लाख लोकांकडे खाण्यासाठी काहीही नाहीये.  
येमेन, सोमालिया आणि उत्तर पूर्वेकडील नायजेरियातही दुष्काळ आणि भूकबळीचीच परिस्थिती आहे. पण ६ वर्षांत दक्षिण सुदान पहिला असा देश आहे, ज्याने नवस्वातंत्र्यानंतर प्रथमच आपला एक भाग दुष्काळी घोषित केला आहे. मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्र अन्न कार्यक्रम आणि बाल मदत निधी युनिसेफने म्हटले आहे की, दक्षिण सुदानच्या साधारणत: ८२ लाख लोकसंख्येपैकी ४९ लाख म्हणजे ४० टक्क्यांहून अधिक लोकांना तत्काळ अन्नाची गरज आहे.  दक्षिण सुदानच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचे प्रमुख इसाईया चोल अरुआई यांनी सांगितले की, उत्तर ग्रेटर युनिटी क्षेत्रातील भागांना दुष्काळग्रस्त जाहीर केले गेले आहे.    
   
केव्हा होतो दुष्काळ जाहीर  
-अन्नधान्याची कमतरता आणि कुपोषण सामान्यत: अनेक जागी असते. या भागाला दुष्काळग्रस्त जाहीर केले जात आहे. पण दुष्काळग्रस्त जाहीर केले जाणे सोपे नाही. दीर्घकाळाच्या दुष्काळानंतर खाद्यान्न, अन्नपदार्थ सामग्री वेळेवर न पोहोचल्यासही दुष्काळ घोषित केला जात नाही. यासाठी काही नियम आहेत. 
     
- या भागात किमान २०% घरात भोजनाची कमतरता, जेवण उपलब्धच नसणे, ते मिळण्याची कुठलीच चिन्हे न दिसणे.  
 
आता काय होईल ?
दुष्काळ जाहीर होण्याचा अर्थ हा नव्हे की, संयुक्त राष्ट्राच्या संघटना वा त्याचे सदस्य देश मदत करतीलच. पण असे केल्याने मानवी दृष्टिकोनातून मदत देणाऱ्या संस्था वेगाने पुढे याव्यात. त्या येतातही. दक्षिण सुदान मानवी दृष्टिकोनातून जगभरात मदत मागू शकतो. 
 
हे पहिल्यांदा नव्हे 
दक्षिण सुदान दीर्घ लढाईनंतर ९ जुलै २०११ रोजी सुदानपासून वेगळा होऊन स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्याच्या लढाईदरम्यान १९९८ मध्येही येथे दुष्काळ पडला होता. स्वातंत्र्यानंतर या तेलसमृद्ध देशात २०१३ मध्ये युद्ध भडकले होते. राष्ट्रपती साल्वा कीर आणि त्यांचे उपराष्ट्रपती रिक माछरचे एकनिष्ठ सैन्य एकमेकांविरुद्ध लढले होते. ऑगस्ट २०१५ मध्ये शांतता करारानंतर युनिटी सरकार बनले होते, पण गेल्या वर्षी जुलैमध्ये ते पुन्हा फुटले होते.  
 
३० टक्क्यांहून अधिक भीषण कुपोषण  
१०,००० च्या लोकसंख्येवर प्रतिदिवशी २ लोकांहून अधिक जणांचा भूकबळीने मृत्यू.  
बातम्या आणखी आहेत...