आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी बाॅम्बची रहस्यमय दुनिया, इसिसला हवाय अणुबाॅम्ब,त्यांना माहितेय तो मिळणार कुठे ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिबलिसी - मागील  वर्षी एका रात्री भंगार मालाचा  व्यापारी अमीरन चादुनेली याने पूर्व सोव्हिएत प्रजासत्ताक जार्जियामध्ये काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील एक छोटे शहर  कोबुलेतीमध्ये एका पुलावर दोन अनोळखी लोकांसमवेत चर्चा केली. त्यातील एकाने स्वत:ला  तुर्कीश तर दुसऱ्याने स्वत:ची रशियन म्हणून ओळख करून दिली. ते काळ्या बाजारात अशा एका वस्तूच्या शोधात होते की ती सोन्याहून  आधिक किमती होती. चादुनेलीला हे माहीत हाेते की, ही वस्तू कोठे मिळेल. पण त्याला हे माहीत नव्हते की, याचे ग्राहक पोलिस आहेत. त्या पुलावरून त्या दोघांना जवळच्या अपार्टमेंटमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांना एका बॉक्समध्ये अणुबाॅम्ब बनविण्यासाठी वापरण्यात येणारे युरेनियम-२३५ दाखविण्यात आले. हे जर एखाद्या शक्तिशाली स्फोटकासोबत मिसळले गेले तर त्याचा एक असा डर्टी बाॅम्ब तयार होईल की, जो स्फोट धडवून आणण्याच्या ठिकाणी उच्चस्तरीय  रेडिएशनबरोबरच विषारीही बनवू शकेल.  टाइमच्या पत्रकारांनी जाॅर्जियाची  राजधानी तिबलिसीमध्ये पाहिलेल्या पोलिस रेकॉर्डनुसार गेल्या वर्षी युरेनियम विकण्याच्या प्रयत्नात पकडल्या गेलेल्या चादुनेलीच्या सहकाऱ्यांमध्ये इमारती तयार करणारे कामगार आणि काही भंगार मालाचे व्यापारी यांचा समावेश होता. अशा लाेकांच्या हाती डर्टी बाॅम्बची सामग्री पोहोचणे चिंताजनक  हाेते. 
 
डर्टी बाॅम्बचे  धोके फार वेगाने वाढत आहेत. चादुनेलीप्रमाणे युरेनियम तसे मुश्किलीने मिळते. पण काही रुग्णालये, अन्य उद्योग आणि मेडिकल इमेजिंग व अन्य उद्देशांसाठी उच्च रेडिओ  अॅक्टिव्ह  सामग्रीचा वापर करतात. जर या विषारी वस्तूंना पारंपरिक स्फाेटकांसमवेत मिसळले गेले तर सुटकेसच्या आकाराचा बाॅम्ब तयार होतो.  शहराच्या बऱ्याच मोठ्या भागात घातक विष फैलावू शकेल अशी याची तीव्रता आहे. अशा प्रकारचा बाॅम्ब हल्ला जर झाला तर जवळपासचा परिसर काही महिन्यांसाठी बंद ठेवावा लागेल. 
 
डर्टी बाॅम्बच्या दीर्घकालीन प्रभावामुळे या घातक हत्याराचे आकर्षण बऱ्याच काळापासून दहशतवाद्यांना आहे. २००४ मध्ये पॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या एका पाहणीनुसार, याचा आर्थिक प्रभाव ९-११ च्या हल्ल्यापेक्षा आधिक खराब असेल. इकडे अमेरिकेने परमाणू सामग्रीचे स्मगलिंग रोखण्यासाठी अनेक देशांना सहकार्य केले अाहे. गेल्या बारा वर्षात अमेरिकन सरकारने परमाणू  सामग्रीची तस्करी रोखण्यासाठी जॉर्जियाला पाच कोटी डॉलरची मदत केली आहे.  
 
अमेरिकेने या पूर्ण मार्गावरील सीमेवर  न्युक्लियर डिटेक्टर लावण्यास मदत केली आहे. यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले आहे.  आधुनिक शस्त्रे दिली आहेत. २०१६ मध्ये याचे परिणाम दिसले तेव्हा जॉर्जियाच्या पोलिसांनी अण्विक सामग्रीच्या तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या  तीन गटांचा पर्दाफाश केला होता. जानेवारीमध्ये डर्टी बाॅम्बमध्ये उपयोगात आणले जाऊ शकणाऱ्या सेसियम-१३७ या घातक अणुकचऱ्याची तुर्कीमध्ये होणारी तस्करी हाणून पाडली होती.  १७ एप्रिल रोजी जॉर्जियाच्या पोलिसांनी दोन कोटी डॉलरमध्ये युरेनियम विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गटाला अटक केली होती. महिन्याच्या शेवटी कोबुलेतीमध्ये चादुनेली आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.  
 
इराक आणि  सिरिया कमजोर पडल्यानंतर  इसिसने रणनीती बदलली आहे. ही दहशतवादी संघटना परमाणु शस्त्रे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. याचे पुरेसे पुरावे मिळालेले आहेेत.  या संघटनेकडे परमाणु शस्त्रे बनविण्याचे तंत्र नाही पण परमाणु सामग्री आहे.  २०१४ मध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी इराकमधील मोसूल शहरावर कब्जा केल्यानंतर एका विद्यापीठात ठेवलेले ४० किलो युरेनियम जप्त करण्यात आले.  त्या वर्षी जुलै महिन्यात एका इराकी दूतावासातील अधिकाऱ्याने संयुक्त राष्ट्रांना पाठविलेल्या पत्रात याची माहिती दिली होती.  संयुक्त राष्ट्राच्या परमाणू एजन्सीचे म्हणणे आहे की,  ही सामग्री कमी दर्जाची आहे आणि फार धोकादायक नाही.  वाॅशिंग्टनमध्ये सामरिक आणि अंातरराष्ट्रीय अध्ययन कंेद्राचे विशेषज्ञ शारोन स्कवासोनी सांगतात की, डर्टी बाॅम्बचे हल्ले पाहण्याचा दिवस फार दूर नाही.  
 
तपास करणारे जॉर्जियाच्या अबखाजिया क्षेत्रामुळे चिंतित आहेत. १९९० च्या दशकात हे क्षेत्र जॉर्जियापासून वेगळे झाले होते. अबखाजिया अशा क्षेत्रात आहे,ज्याची कोणती अांतरराष्ट्रीय सीमा नाही. याला संघर्ष आणि विवादाचे क्षेत्र म्हणतात. हे क्षेत्र रशियाच्या प्रभावाखाली आहे. असे भाग तस्करांचे अड्डे बनतात. पण केवळ अबखाजियामध्येच परमाणू केंद्र होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाने आपले पहिले परमाणू प्रतिष्ठान येथेच बनविले होते. सोव्हिएत संघाच्या पतनानंतर स्वतंत्र झालेले  जॉर्जिया आणि विद्रोही यांच्या दरम्यान अबखाजियावर कब्जा करण्यासाठी मोठा संघर्ष झाला. अबखाजिया जॉर्जियापासून वेगळा झाला पण त्याच्याकडे असलेल्या अण्विक भांडाराचा पत्ता  लागलेला नाही.  जॉर्जियामध्ये ज्या पुलाजवळ चादुनेलीची मुलाखत युरेनियम खरेदी करणाऱ्या ज्या पोलिसांशी झाली होती,तेथून दोन तासांच्या आत डर्टी बाॅम्बचे सामान मोटार अथवा नावेने  तुर्कीमध्ये पोहोचविले जाऊ शकते. यानंतर  सिरिया, इराकमध्ये पोहोचविण्यासाठी  फक्त काही दिवसच लागतात. हुकूमशाही आणि दुष्ट सरकारांशिवाय पैशाच्या लोभाने अण्विक धोका फार वाढलेला आहे.  चादुनेलीला जेथे गुप्त पोलिसांनी पकडले होते, तेथे  युरेनियमच्या छोट्या  बॉक्ससाठी ३० लाख डॉलर देण्याचे कबूल केले होते. 
( जेके जे मिलर, वाशिंग्टन यांच्यासमवेत)
 
पाकिस्तानचा छोटा बॉम्ब धोकादायक
१९७० नंतर परमाणू शस्त्रसंपन्न देशांची संख्या पाच वरून नऊ इतकी वाढल्याने तिसऱ्या महायुद्धाबरोबरच अणुप्रसाराचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोणताही दुष्ट देश किंवा दहशतवादी यांच्या हातात ही परमाणू शस्त्रे जाण्याची भीती पाहता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराणच्या कथित परमाणू कार्यक्रमांवर अस्थायी बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर कोरिया नेहमीच बॅलेस्टिक मिसाइलचे परीक्षण करतो. हा देश परमाणू माहिती विकण्यात सर्वात पुढे आहे. त्यांच्याकडे डझनापेक्षा जास्त अणुबॉम्ब असावेत. पाकिस्तान लहान आणि सहजपणे घेऊन जाता येणारे अण्विक अस्त्रे बनवत आहे.
 
पू्र्व सेव्हिएत राज्यातून चोरी
१९९० च्या दशकात सेव्हियत संघाच्या पतनानंतर अराजकता निर्माण झाली होती. त्यावेळी रशिया आणि त्याच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये अणु केंद्र आणि अणुभट्ट्यांमधून किरणोत्सारी सामग्रीची सतत चोरी होत होती. त्या काळात पोलिसांनी म्युनिच, प्राग अशा शहरांमध्ये ही सामग्री जप्त केली होती. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणावर सेव्हिएत परमाणू इंधन काळ्या बाजारात जाऊ शकते.
 
कुख्यात अण्वस्त्र तस्करांचा अड्डा
पूर्व सेव्हिएत प्रजासत्ताक मोल्दोवा आणि युक्रेन यांच्यादरम्यान डनिस्टर क्षेत्रात जगातील सर्वात बदनाम असलेल्या अण्वस्त्र तस्कर अलेक्झांडर अघीनको याचा अड्डा आहे. रशियन-युक्रेन नागरिक असलेला अघीनको हा कर्नल नावाने प्रसिद्ध आहे. २०११ मध्ये दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी युरेनियम विक्री प्रकरणी अमेरिका आणि मोल्दोवा त्याच्या शोधात आहेत. मोल्दोवा पोलिसांनी त्याच्या एका एजंटाला अटक केली होती. त्याच्या घरातून डर्टी बॉम्ब बनवण्याची ब्ल्यू प्रिंट मिळाली होती. पण कर्नल अद्याप फरार आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, बेपत्ता मुलांच्या प्रकरणाला चढला राजकीय रंग...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...