आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्षानुसार बदलते व्हाइट हाऊसचे अंतरंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा राष्ट्रपती बराक ओबामा यांना पहिल्यांदा व्हाइट हाऊसमधील कर्मचाऱ्यांचा (जवळपास १०० कर्मचारी, आचारी, माळी आणि स्वागत कर्मचारी) परिचय करून देण्यात आला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. बहुतांश लोकांप्रमाणे त्यांनाही माहीत नव्हते की या भल्यादांडग्या वास्तूत कामासाठी किती लोकांची गरज लागते. प्रथम महिला मिशेल ओबामा यांना जेव्हा या कर्मचाऱ्यांचा परिचय करून देण्यात आला तेव्हा त्या टीमला म्हणाल्या, आता आम्ही तुमच्या मैदानात आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांना या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. ज्यांनी जॉन अाणि अबिगेल अॅडम्स यांच्या काळापासून प्रत्येक राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या भव्यदिव्य वास्तूत घराची अनुभूती करून दिली. 

मिशेल ओबामा यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते, तेथे गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की त्याठिकाणी काय आहे? मात्र ट्रम्प यांच्यासाठी घरगुती कर्मचारी ही काही नवीन गोष्ट नाही. मेलानिया ट्रम्प काही महिने वॉशिंग्टनला येणार नाहीत. ओबामा दांपत्याच्या तुलनेत ट्रम्प कुटुंबासाठी हे परिवर्तन सोपे असेल. काही कर्मचाऱ्यांना भीती वाटते की नवनिर्वाचित राष्ट्रपती त्यांच्या जागी ते आपले कर्मचारी, आचारी आणि इतर लोकांना नियुक्त करतील काय? बहुतांश कर्मचारी येथे कामासाठी उत्सुक आहेत. 

दिसते त्याहून व्हाइट हाऊस खूप मोठे आहे. ही सहामजली इमारत आहे. दोन छोटे तळघर, ग्राउंड फ्लोअरला मुख्य स्वयंपाकघर आहे. पहिल्या मजल्यावर दोन तळघर आहेत. त्यात प्रमुख स्वागत अधिकाऱ्याचे कार्यालय आणि स्वयंपाकघर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर (कुटुंबांना राहण्यासाठी जागा). ट्रम्प कुटुंब ट्रम्प टॉवरमध्ये तीनमजली पेंट हाऊस आणि इतर भव्य वास्तूत वास्तव्य करते. त्यांना व्हाइट हाऊस त्यामानाने किरकोळ भासेल!

व्हाइट हाऊसमध्ये अनेक अलिखित नियम आणि परंपरा आहेत. जेव्हा मिशेल पहिल्यांदा येथे आल्या तेव्हा त्यांच्यासमवेत त्यांची सहायक होती. तत्कालीन राष्ट्रपती बुश यांच्या पत्नी लारा यांनी सहायकाला मागेच रोखले. त्या म्हणाल्या हे मिशेल आणि माझ्यासाठी आहे. बुश यांचा स्टाफ तेव्हा चकित झाला ज्यावेळी मिशेल यांनी बराक अोबामा यांना शपथग्रहण सोहळ्याच्या सकाळी एक पत्रिका भेट दिली. मिशेल यांना माहीत होते की, लारा आपल्या आठवणी लिहीत आहे.  मिशेल यांनी  प्रोटोकाल बाजूला ठेवू हे केले होते. नवीन राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंब या घरी काही बदल करू शकते. मात्र ओबामा दांपत्याला हे कळले होते की, काही यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. त्यांना काही बदल करायचे होते. त्या वेळचे व्हाइट हाऊसमधील मुख्य सत्कार अधिकारी अॅडमिरल स्टीफन रोचोन म्हणाले, त्यांना परवानगी मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल. बाकी इतर कामे मामुली होती. रोचोन यांनी सांगितले की, राष्ट्रपतींना बाथरूममधील शॉवरने पावसाची अनुभूती द्यावी असे वाटायचे.

वास्तूतील कर्मचारी येणाऱ्या कुटुंबासाठी त्यांचा काळ चांगला बनवण्यासाठी काहीही कसूर सोडत नाहीत. पेनसिल्व्हानिया अॅव्हेन्यूत शपथग्रहण सोहळा पाहिल्यानंतर ओबामा दांपत्याने जुन्या डायनिंग टेबलवरच जेवण केले होते. त्यापूर्वी अनेक आठवड्यांपू‌र्वी तत्कालीन सोशल सेक्रेटरी डिझायरी रॉजर्स यांनी व्हाइट हाऊसच्या फ्लोरिस्टसह डायनिंग रूममधील बैठक व्यवस्थेचा आढावा घेतला होता.  माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सिया एका रात्री आजारी पडली. हिलरी सरळ स्वयंपाकघरात दाखल झाल्या. आपल्या मुलीसाठी त्या अंडाभुर्जी बनवण्यासाठी फ्राइंग पॅन शोधू लागल्या. तेथे एक आचारी उपस्थित होता. तो म्हणाला, आम्ही खालून ऑम्लेट आणू शकतो. हिलरी म्हणाल्या, नको. आम्ही अमेरिकेत अन्य ठिकाणी असतो तर माझ्या मुलीला अंडाभुर्जी आणि अॅपलसॉस बनवून दिला असता. येथेही मी तसेच करू इच्छिते. बिल क्लिंटनही काही परंपरांमुळे नाराज होते. जेव्हा एका कर्मचाऱ्याने कुटुंबाला ख्रिसमस ट्री बनवण्यात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा ते नाराज झाले. कारण त्यांना चेल्सियासमवेत ट्री बनवायचा होता. ९३१ ते १९५३ पर्यंत व्हाइट हाऊसचे बटलर राहिलेले अॅलोंजो फील्ड्स एक राष्ट्रपती तेे दुसऱ्या राष्ट्रपतीच्या संक्रमण काळाला अचानक आलेला मृत्यू असे म्हणतात. अलविदा म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथेचे ते वर्णन करत होते. शपथग्रहणाच्या दिवशी सकाळी स्टेट डायनिंग रूममध्ये एकत्र स्टाफचा निरोप घेताना राष्ट्रपती एच. डब्ल्यू. बुश सीनियर भावुक झाले होते. शपथग्रहण सोहळ्याला रवाना होण्यापूर्वी बार्बरा बुश यांनी बटलरांची गळाफेट घेतली होती.  

(ब्रोवर, द रेसिडेन्स : इनसाइड द प्रायव्हेट वर्ल्ड ऑफ द व्हाइट हाउस के लेखक हैं।)
 
व्हाइट हाऊसविषयी...
- प्रारंभीचे दिवस : बहुतांश लोकांना माहीत नसते की सत्तांतर कसे होते? तुम्ही खुर्चीवर जाऊन बसता आणि कामाची सुरुवात होते. 
- डॅन फिफर, राष्ट्रपतींचे माजी सल्लागार
आमच्या डेस्कवर संगणक होते. मात्र लॅपटॉप, आयपॅड आणि आयफोन नव्हता. नेटवर्कही चांगले येत नसे. तुम्ही स्वत:चे डिव्हाइस आणले तरी त्याचा उपयोग करता येत नव्हता. - व्हेलरी जॅरेट, राष्ट्रपतींच्या सल्लागार 
- शिकण्याचा काळ :  राष्ट्रपतीला खूप फायलींवर सही करावी लागत नाही. जेव्हा मी काही रुटीन काम सांगायचे तेव्हा ते म्हणायचे ठीक आहे. तू कर. 
- लिझा ब्राऊन, माजी स्टाफ सेक्रेटरी
अनेक महिन्यांनंतर मला जाणीव झाली की आम्हाला सरकारबाबत फार कमी माहिती आहे. 
- ब्रायन डिसे, राष्ट्रपतींचे माजी सल्लागार
- चांगला सल्ला : व्हाइट हाऊसमध्ये ही खास गोष्ट आहे की सल्ल्यासाठी तुम्ही अनेकांशी संपर्क साधू शकतो. तुम्ही सक्रिय असणे गरजेचे आहे. 
- योहानीस अब्राहम, राष्ट्रपतींचे सहायक
राष्ट्रपतींनी आम्हाला नेहमीच सांगितले की सत्य आहे ते लिहा. त्यांनी पत्र विभाग कार्यालयाला निर्देश दिले होते की, त्यांना दरदिवशी दहा पत्रे देण्यात यावीत. राष्ट्रपतींचे म्हणणे होते की, सर्वांनीच ही पत्रे वाचावीत.
- कोडी किनन, भाषण लेखण डायरेक्टर