आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमाेना, कर्बर, मरे, नदालची अागेकूच; त्साेंगाचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- अव्वल मानांकित अॅँडी मरे, माजी नंबर वन राफेल नदाल, सातव्या मानांकित मरीन सिलीच, अव्वल मानांकित एंजेलीक कर्बर, सिमाेना हालेपने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये धडक मारली. दुसरीकडे १२ वा मानांकित त्साेंगाचे  अाव्हान संपुष्टात अाले.  महिला गटात अव्वल  मानांकित कर्बरने तिसऱ्या फेरीत शेल्बी राॅजर्सचा ६-४, ७-६, ६-४ ने पराभव केला. तसेच योकाेविकने तिसऱ्या फेरीत गुलबीसचा ६-४, ६-१, ७-६ ने पराभव केला.
 
१३ व्या मानांकित ग्रिगाेर दिमित्राेवने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत बिगरमानांकित सेलाचा पराभव केल. त्याने ६-१, ६-१ ने सामना जिंकला. यासह त्याने ६० मिनिटांत स्पर्धेतील पुढची फेरी गाठली.
 
मरेकडून फाेगनिनीचा पराभव : अव्वल मानांकित अँडी मरेने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने २८ व्या मानांकित फेबियाे फाेगनिनीचा पराभव केला. त्याने ६-२, ४-६, ६-१, ७-५  ने विजयश्री खेचून अाणली. यासाठी त्याने २ तास ३९ मिनिटांपर्यंत झुंज दिली.   

सिलीचची जाॅन्सनवर मात : सातव्या मानांकित मरीन सिलीचने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत इंग्लंडच्या जाॅन्सनचा पराभव केला. त्याने ४-६, ७-६, ६-४ ने सामना जिंकला. यासह त्याने पुढची फेरी गाठली.
 
सिमाेना हालेपकडून पेंगचा पराभव
महिला एकेरीत दुसऱ्या मानांकित सिमाेना हालेपने एकतर्फी विजय संपादन केला. तिने चीनच्या पेंगला सरळ दाेन सेटमध्ये पराभूत केले. तिने ६-४, ७-६ ने मात दिली. यासह तिने १ तास ३९ मिनिटांत पेंगला बाहेरचा रस्ता दाखवला.  

भारताची झिल देसाई चमकली
भारताची १८ वर्षीय  झिल देसाई  ज्युनियर गटाच्या सलामीला चमकली. तिने  ६८ मिनिटांत सलामी सामना जिंकली. तिने  बिगरमानांकित साताेचा पराभव केला. तिने ६-१, ६-१ ने  विजय संपादन करून दुसरी फेरी गाठली.

सानिया, बाेपन्नाची दुहेरीत अागेकूच
भारताच्या  सानिया मिर्झा अाणि राेहन बाेपन्नाने अापापल्या गटात विजयी अागेकूच केली. सानियाने अापली सहकारी फ्लिपकेन्ससाेबत महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत इंग्लंडच्या बाेर्डी-वाॅटसनवर ६-३, ३-६, ६-४ ने मात केली. बाेपन्नाने डाब्राेवास्कीने मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवला.

नदाल १३५ मिनिटांत विजयी
चाैथ्या मानांकित राफेल नदालने दाेन तास १५ मिनिटे रंगलेला तिसऱ्या फेरीचा सामना जिंकला. त्याने लढतीमध्ये खाचानाेवला पराभूत केले. त्याने ६-१, ६-४, ७-६ अशा फरकाने तीन सेटमध्ये सामना जिंकला. यासाठी त्याला दाेन तासांपेक्षा अधिक वेळ झुंज द्यावी लागली. सलगचे दाेन सेट गमावल्यानंतर खाचानाेवने केलेले पुनरागमन फारसे यशस्वी ठरले नाही.
 
बातम्या आणखी आहेत...