आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१६ मध्ये संपूर्ण वर्षभर ब्रेक्झिट, पोस्ट-ट्रूथ, फेक न्यूज यांसारखे शब्द चर्चित; पण ‘वर्ड ऑफ द इयर’च्या लायक नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्रकाशक किंवा भाषातज्ज्ञ गेल्या काही वर्षांपासून वर्ष संपल्यानंतर ‘वर्ड ऑफ द इयर’ निवडतात. २०१६ मध्येही ब्रेक्झिट, पोस्ट ट्रूथ, रिमोनर्स, फेक न्यूजसारखे अनेक शब्द ‘वर्ड ऑफ द इयर’च्या स्पर्धेत होते, पण त्यापैकी कुठलाही आतापर्यंत ‘वर्ड ऑफ द इयर’साठी निवडला गेला नाही. ते कमी प्रभावी आहेत, असे मानले जात आहे. ‘वर्ड ऑफ द इयर’ निवडीसाठी दोन प्रमुख आधार आहेत. पहिला, असा शब्द जो नवीन किंवा कमी प्रचलित असूनही संपूर्ण वर्षभर चर्चित असावा. दुसरा तो भविष्यातही वापरला जाण्याची शक्यता असावी. असेच काही शब्द जे वर्षभर चर्चेत होते... 
 
 ब्रेक्झिट : हा शब्द वर्ड ऑफ द इयर बनण्याच्या स्पर्धेत सर्वात पुढे राहिला. ब्रिटनमध्ये जेव्हा युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची (एक्झिट) मागणी वाढली तेव्हा हा शब्द प्रचलनात आला. त्याआधी युरोपियन युनियनमधून ग्रीसला काढण्यासाठी ग्रेक्झिट हा शब्द वापरला होता; पण ब्रेक्झिटचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा संभाव्य परिणाम पाहता हा शब्द जास्त प्रचलित झाला आहे. या वर्षीही त्याचा सतत वापर होत आहे.  

 रिमोनर्स : म्हणजे असे लोक जे एखाद्या निकालामुळे नाराज आहेत. हा शब्द ब्रिटनमधून आला. जे लोक ब्रेक्झिटच्या विरोधात होते, पण जनमत संग्रहात त्याच्या बाजूने कौल मिळाला तेव्हा हे लोक नाराज झाले. पुन्हा सर्वेक्षण करण्याची मागणी करणाऱ्यांना रिमोनर्स म्हणतात.  

फेक-न्यूज : युरोप आणि अमेरिकेत गेल्या वर्षी अनेक खोट्या बातम्या खऱ्या बातम्यासारख्या प्रसारित करण्यात आल्या. त्यामुळे ‘फेक-न्यूज’चर्चेत राहिला. हिलरी क्लिंटननी आयएसच्या दहशतवाद्यांनी शस्त्रे विकली आहेत किंवा पोप फ्रान्सिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे, यांसारख्या चुकीच्या बातम्या ऑनलाइन मीडिया आणि सोशल साइट्सवर प्रकाशित-प्रसारित झाल्या.  अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत ट्रम्प यांना जिंकवणाऱ्या लोकांत समाविष्ट लोक किंवा संघटनेसाठी अल्ट-राइट शब्द प्रचलित झाला होता. त्यांच्यावर वंशभेदाचे समर्थन करण्याचा आरोप आहे. हा शब्द विशेषत्वाने श्वेतवर्णीयांसाठी वापरला गेला.  

 अॅडल्टिंग :  वय जबाबदारी घेण्याचे  आहे, पण जे घेत नाहीत अशा युवकांसाठी हा शब्द वापरण्यात आला. म्हणजे वय वाढूनही  मोठे व्हायचे नाही, असे लोक. 
 
ब्रेक्झिट आणि अमेरिकी निवडणुकीतून आला पोस्ट-ट्रूथ  
हा शब्द चर्चेत आणण्याचे श्रेय ब्रिटनमध्ये ब्रेक्झिट समर्थक आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांना जाते. युरोपियन युनियनच्या तिजोरीत ब्रिटन दरवर्षी ३५ कोटी पौंड देतो, असा प्रचार ब्रेक्झिट समर्थकांनी दीर्घ काळ केला. दुसरीकडे ज्यात सत्य नाही असे दावे ट्रम्पही अनेक महिने करत होते. माध्यम विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या अनेक असत्य बातम्या सतत प्रसारित झाल्याने लोक त्या स्वीकारायला लागले, त्यामुळे आम्ही आता पोस्ट-ट्रूथ (ज्याला सत्य जाणण्याची इच्छा नाही असा समाज) समाज झालो आहोत.  
 
बातम्या आणखी आहेत...