आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेब्रा फिशद्वारे अंधत्वावर मात, भारतीय संशोधकाचा समावेश असलेल्या अभ्यास प्रकल्पाचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - झेब्रा फिशच्या माध्यमातून मानवी अंधत्वावर मात करणे शक्य होऊ शकते, असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. प्रकल्पात भारतीय संशोधकाचाही समावेश आहे. झेब्रा फिशच्या मेंदूतील काही रासायनिक संकेतावरून हे स्पष्ट झाले आहे. या संशोधनामुळे मानवी दृष्टी पटल पुन्हा नव्याने तयार करणे शक्य होणार आहे. ही झेब्रा फिशच्या मेंदूचा काही भाग डोळ्याच्या पडद्याची नैसर्गिक पद्धतीने दुरुस्ती करु शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. विशिष्ट प्रकारच्या जखमा किंवा अन्य कारणांमुळे पडद्याला दुखापत होऊन माणसाला दृष्टी गमवावी लागते. पूर्वीच्या अभ्यासात माशाच्या मेंदूतील विशिष्ट भागामुळे दृष्टी पूर्ववत करण्याची प्रक्रिया यशस्वी ठरली नव्हती. परंतु आम्ही केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे, असे जेम्स पॅटर्न यांनी म्हटले आहे. ते व्हेंडरबिल्ट विद्यापीठात प्रोफेसर आहेत.
 
या अभ्यास प्रकल्पात महेश राव हा भारतीय वंशाचा संशोधकही सहभागी आहे. झेब्रा फिशने डोळे गमावल्यानंतर तो २८ दिवसांत पुन्हा दृष्टी मिळवतो. ही किमया झेब्रा फिशला निसर्गदत्त असल्याने त्याचा उपयोग मानवी अंधत्वावर मात करण्यासाठी होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.  
 
जखम नसलेले रेटिनाही दुरुस्त करणे शक्य
दृष्टिपटल जखमी नसले तरी दृष्टी प्रदान करण्याची प्रक्रिया याद्वारे पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. पूर्वीच्या प्रयोगात रेटिनाला गंभीर जखम झाल्यानंतरच या पद्धतीचा वापर उपयोगी ठरू शकतो, असा दावा केला जात होता. मात्र ताज्या अभ्यासात मात्र झेब्रा फिशच्या मदतीने डोळ्याच्या पडद्याला नैसर्गिक पद्धतीने दुरुस्त करणे शक्य होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.  
 
रेटिनात कमालीचे साम्य आढळले
झेब्रा फिश व मानवी रेटिना यांच्यात कमालीचे साम्य असल्यामुळे पुन्हा दृष्टी मिळवण्याच्या संशोधकांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. डोळ्याचा हा पडदा अतिशय पातळ आहे. ०.५ मिलिमीटरहून कमी जाडीचा हा पडदा आहे. झेब्रा फिशमध्ये आडव्या पेशी, फोटोरिसेप्टर इत्यादी गोष्टींच्या तीन पातळ्या रेटिनामध्ये आढळून आल्या आहेत.  
बातम्या आणखी आहेत...