आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू जलवाटपप्रकरणी पाकिस्तानला झटका, जागतिक बँकेने आता जारी केली फॅक्ट शीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वॉशिंग्टन - सिंधू जलवाटप करारावर जागतिक बँकेने पाकिस्तानला झटका दिला आहे. बँकेने एक फॅक्ट शीट जारी करून भारत पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प सुरू करू शकतो, असे स्पष्ट केले आहे.  
 
जम्मू-काश्मीरमधील प्रस्तावित किशनगंगा व रातले जलविद्युत प्रकल्पाच्या डिझाइनवर पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तानने त्याविरुद्ध गेल्या वर्षी जागतिक बँकेत तक्रारही केली होती. ५७ वर्षे जुन्या जलवाटपात जागतिक बँकेने मध्यस्थी करावी, अशी पाकिस्तानची मागणी होती. त्यासाठी एखादा लवाद स्थापन करावा, असेही पाकला वाटत होते. या मुद्द्यावर याच आठवड्यात भारत-पाक यांच्यात सचिवस्तरावर चर्चा झाली होती. फॅक्ट शीटमध्ये जागतिक बँकेने दोन्ही देशांतील चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले. चर्चेचा दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जागतिक बँकेने संस्थेची तटस्थता व नि:पक्षपात कायम राहील, असे २५ जुलै रोजी पत्र पाठवून अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना यांना कळवले आहे.  
 
उभय देशांना तीन नद्या  : पाण्याच्या वाटपावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील करार झाला होता. त्यात जागतिक बँकेची मध्यस्थी होती. कराचीत १९ सप्टेंबर १९६० मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अय्युब खान यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. करारात सहा नद्या आहेत. पूर्वेकडील तीन नद्यांचा समावेश आहे. व्यास, रावी, सतलजचे नियंत्रण भारताकडे, तर पश्चिमेकडील सिंधू, चिनाब, झेलमचे नियंत्रण पाकिस्तानकडे आहे.  
 
दोन प्रकल्प १ हजार १८० मेगावॅटचे  
भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये झेलम व चिनाबच्या उपनद्या किशनगंगा आणि रातलेवर जलविद्युत प्रकल्प बनवण्याचे काम हाती घेतले आहे. किशनगंगा प्रकल्प ३३० मेगावॅट, तर रातले ८५० मेगावॅटचा आहे. करारात दोन्ही नद्यांसह सिंधू नदीला पश्चिमेकडील नदी म्हणून परिभाषित केले आहे. खरे तर प्रकल्पानंतरही पाकिस्तानला पाणीवापरावर बंदी नाही. भारताच्या वाट्यात प्रकल्पाही आहे. 
बातम्या आणखी आहेत...