आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो पाण्याच्या फुग्यांनी दिला पुनर्जन्माचा अनुभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग -  हाँगकाँगमध्ये बुधवारी व्हिक्टोरिया हार्बर परिसरात हजारोंच्या संख्येने पाण्याचे फुगे हवेत तरंगत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा आनंददायी क्षण होता. निमित्त होते ‘मेमोरियल रिबर्थ’ प्रकल्पाचे. जपानचे कलाकार शिंजी आेहमकी यांची ही संकल्पना. पुनर्जन्मावर तर्क लढवले जातात. परंतु जपानच्या या कलाकाराने आपल्या कलेतून त्यावर भाष्य केले . या प्रकल्पात फुग्यांचे एक यंत्र ठेवण्यात आले. फुगे जसे काही क्षणात विरून जातात. तसेच हे जग असते तर ?  लोकांना या गोष्टींचा अनुभव सामूहिकपणे घेता यायला हवा, अशी माझी इच्छा होती. त्यामुळेच हा प्रयत्न केला, असे आेहमकी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...