आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयॉर्क टाइम्समधून - निवडणुकांवरून अमेरिकेत वातावरण तापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत २०१६ मध्ये होणा-या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीस अजून १८ महिने बाकी आहेत. परंतु दोन्ही प्रमुख पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला बहुतांश राज्यांत बहुमत मिळाल्याने रिपब्लिकन नेत्यांना जास्त महत्त्वाकांक्षा आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी पक्षातील अनेक नेत्यांनी दावा केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अपेक्षाही जास्त आहेत. त्यांच्याकडे हिलरी क्लिंटनसारखे प्रभावशाली नाव आहे. त्या ओबामांच्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यांनी २०१४ पासूनच निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रिपब्लिकन पक्षात टेड क्रूझ आणि रँड पॉल यांची नावे आघाडीवर आहेत. अमेरिकी जनता कोणाला व्हाइट हाऊसमध्ये पाठवते, याबद्दल जाणून घेऊया-
जबरदस्त पाठिंबा मिळूनही विजयाची खात्री नसते
मार्क लिबोविच, राजकीय विश्लेषक
राष्ट्राध्यक्षपदाचे दावेदार म्हणून एक डझनाहून जास्त नेते स्पर्धेत उतरले आहेत. त्यात ध्रुवीकरणाचे शिकार कोण ठरेल? तर हिलरी क्लिंटन यांचे नाव येते. यास जबाबदार कोण असेल, तर काही सांगता येत नाही. कारण लोक नेहमी तेच करत आले आहेत. लोकांना तेच करायचे असेल तर यात त्यांचाही दोष नाही, राष्ट्राध्यक्षांचाही नाही किंवा प्रसिद्धिमाध्यमांनाही दोष देऊन उपयोग नाही. कारण दीर्घ काळापासून अमेरिकेत विभागणी होत आली आहे. विशेषत: निवडणुकीच्या दरम्यान असे घडते. राजकीय क्षेत्रात हिलरींचे नाव आहे. त्या जिंकण्याचीही संधी आहे; परंतु अडचणीही येतात. नुकतेच असेही काही मुद्दे आहेत ज्यामुळे जे ध्रुवीकरणाचे शिकार बनत आहेत. यात इस्रायल, इराण, क्लायमेट चेंज आणि पब्लिक ब्रेस्ट फीडिंग अादींचा समावेश होतो. यातून बाहेर पडणे अवघड आहे. आम्ही गोंधळून गेलो आहोत आणि यास कोणाला जबाबदार धरता येणार नाही.

२०१६ च्या निवडणुकीत अमेरिकी जनतेत हिलरींच्या नावास सर्वाधिक पसंती आहे. रिपब्लिकनच्या सर्व उमेदवारांसमोर हिलरींचे आव्हान आहे. त्यांचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाहता जनतेचा त्यांना जबरदस्त पाठिंबा मिळेल; परंतु माझ्यासमोर जॉर्ज डब्ल्यू. बुश (ज्युनिअर बुश), बिल क्लिंटन आणि बराक ओबामा या तीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका पाहिल्यावर त्यात ध्रुवीकरणाची शक्यता होती. या तिन्ही निवडणुकांच्या घडामोडींवर मी लक्ष ठेवून होतो. त्यात असे दिसून आले की, ज्याला सर्वाधिक पाठिंबा मिळतो आहे, तोच पराभूत होऊ शकतो. मात्र, तसे घडले नाही. बराक ओबामा यांना ६ वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या डेमॉक्रेटिक पक्षाच्या ७९ टक्के नेत्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. विरोध दर्शवणारे रिपब्लिकनचे केवळ ९ टक्के नेते होते. मात्र, जॉर्ज डब्ल्यू बुश यांना ६ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकनच्या ७९ टक्के नेत्यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुकच केले होते. विरोधात डेमाॅक्रेटिकचे केवळ ९ टक्के नेते होते. हे अमेरिकेचे राजकारण आहे.
© The New York Times
पुढील स्लाइड्सवर वाचा, हिलरी क्लिंटन यांना मिळेल का अनुभवाचा फायदा, आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारांची मते...