आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमासाठी वाट्टेल ते.. सर्वकाही विकले, सरतेशेवटी उरला फक्त एक श्वान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एका हवाईसुंदरीने आपल्या स्वप्नातील राजकुमाराच्या शोधासाठी अर्धे आयुष्य घालवले आहे. सरतेशेवटी तिच्याकडे केवळ श्वानाशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही. एवढे होऊनही ती एका कॅम्पर वाहनातून राजकुमाराच्या शोधमोहिमेवर निघाली आहे.

लंडनमध्ये मर्सीसाइडच्या विरालमध्ये राहणारी ४९ वर्षीय निक्की टेलर सिंगल मदर आहे. निक्कीने एकटीने आपला मुलगा फिलला वाढवले असून तो सध्या २७ वर्षांचा आहे. एका इंग्रजी वेबसाइटनुसार, हवाईसुंदरी म्हणून नोकरी करताना ती स्कॉटलंडच्या प्रेमात पडली होती. आता ती सर्वकाही विकून राजकुमाराच्या शोधात निघाली आहे. निक्कीने हे वाहन
चालवले नाही, मात्र ती एकटे सर्वकाही करेल, असा तिला विश्वास आहे. निक्कीच्या म्हणण्यानुसार, एखाद्या राजकुमारशी लग्न व्हावे आणि महालात राहावे, असे माझे लहानपणीचे स्वप्न होते. एवढ्या वर्षांत मला राजकुमार मिळाला नाही. मात्र, मी आणखी वाट पाहू शकत नाही. या शोधमोहिमेसाठी निक्कीने एक कॅम्पर व्हॅन
खरेदी केली आहे. त्यात तिच्या पाळीव कुत्र्याची सोबत असेल. प्रेमाच्या बाबत मी भाग्यवान नाही. अनेक डेटिंग वेबसाइटवर चॅटिंग केल्यानंतरही काहीच प्राप्त झाले नाही,असे निक्कीचे म्हणणे आहे.

कुटुंबाची मदत
निक्कीच्या प्रवासाबाबत कुटुंबीय धास्तावले आहे. मात्र, हा तिचा हक्क असून तिला तिचे प्रेम मिळायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक चांगल्या-वाईट घटनांनंतरही निक्की रोमँटिक असून राजकुमारासोबत सुखासमाधानाने आयुष्य जगता यावे, अशी तिची इच्छा आहे.