अबुजा - उत्तर पूर्वेकडील देश नायजेरियातील दमास्कमध्ये दहशतवादी संघटना बाेकाे हरमने शेकडाे नागरिकांची कत्तल केली अाहे. स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेकडाे नागरिकांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह त्यांच्या घराबाहेर अाढळून अाले अाहेत. काैमी कुसूर नावाच्या एका स्थानिक नागरिकाच्या मतानुसार, या भागातील घरांमध्ये तसेच समास्क नदीमध्ये शेकडाे कुजलेले मृतदेह अाढळून अाले अाहेत. मृतदेह ताब्यात घेत २० सामूहिक िठकाणी त्यांना दफन करण्यात अाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी िदली अाहे. या मृतदेहांना दफन करण्यात मदत करणाऱ्या माेहम्मद सादिक या नागरिकाने िदलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिकांचा समावेश असण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे बाेर्नाे राज्यातील सरकारने मृतांचा अाकडा िनश्चितपणे सांगता येणार नसल्याचे म्हटले अाहे.
चाड तलावाजवळील करमगा अायलँडवर हल्ला : मागील अाठवड्यातही बाेकाे हरमच्या दहशतवाद्यांनी चाड तलावाजवळ हल्ला करत डझनावर सैनिक अाणि नागरिकांची हत्या केली हाेती. तलावाजवळील करमगा अायलँडपर्यंत दहशतवादी माेटार बाेटने अाले अाणि त्यांनी बेछूट गाेळीबार करत अनेकांची हत्या केली. यादरम्यान, दहशतवादी अाणि सैनिकांमध्ये घमासान युद्ध झाल्याची माहिती या गाेळीबारात बचावलेल्या एका मच्छीमाराने िदली अाहे. नायजेरियन सैन्याने या हल्ल्याला दुजाेरा िदला अाहे.