आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nigeria Ready To Negotiate Release Of Chibok Girls With Boko Haram

नायजेरिया सरकार बोको हरमशी शांती चर्चेस तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लागोस - नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुहारी यांनी दहशतवादी संघटना बोको हरमशी चर्चेची तयारी दर्शवली आहे, परंतु अपहृत मुली सुरक्षित असल्याची हमी अगोदर संघटनेने द्यावी, अशी अट बुहारी यांनी घातली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये २०० मुलींचे अपहरण झाले होते.

पूर्वाश्रमीचे लष्करशहा राहिलेले बुहारी म्हणाले, बोको हरम खात्री देत असल्यास त्यांच्याशी वाटाघाटी केल्या जाऊ शकतात.

देशाच्या गुप्तहेर अधिकाऱ्याकडे अपहृत मुलींबद्दलची काहीही माहिती नाही. बोको हरमने ईशान्येकडील चिबाॅकच्या एका वसतिगृहातून या मुलींचे अपहरण केले होते. २०१४ मध्ये हे अपहरण झाले होते. मुलींच्या सोडवणुकीसाठी गत राष्ट्राध्यक्ष गुडलक जोनाथन यांच्या कार्यकाळातही प्रयत्न झाले होते. परंतु त्यात यश आले नव्हते. तेव्हापासून नायजेरिया सैन्याने बोको हरमच्या तावडीतून शेकडो जणांची सोडवणूक केली, परंतु चिबाँकमधील मुली अजूनही सापडलेल्या नाहीत. दरम्यान, देशात गेल्या काही वर्षांत बोको हरमने सामान्य नागरिकांना वेठीस धरून सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला होता.