आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जबरदस्त आत्मघातकी बॉम्बस्फोटात नायजेरिया हादरले; मशीदीला लक्ष्य, किमान 50 जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल) - Divya Marathi
(फाइल)

इंटरनॅशनल डेस्क - नायजेरियाच्या उत्तरेकडील प्रांतात दहशतवाद्यांनी जबरदस्त आत्मघातकी बॉम्ब घडवला आहे. मशीदीला लक्ष्य करून मंगळवारी झालेल्या या बॉम्बस्फोटात किमान 50 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, बॉम्बस्फोट एवढा भयंकर होता की 50 जणांचा जागीच मृत्यू झाला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जखमींची संख्या अद्याप मोजण्यात आलेली नाही. तरीही जखमींची संख्या शेकडोंमध्ये आहे असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

 

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, अदामावा प्रांतात एका अल्पवयीन आत्मघातकी हल्लेखोराने मशीदीच्या दारावर येऊन बॉम्बची कळ दाबली. काहींनी सांगितल्याप्रमाणे, त्याने मशीदीत येऊन नमाज अदा केली आणि नंतर हे काम केले. मशीदीत शेकडो लोक प्रार्थना करत होते. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. तरीही हल्ला करण्याची शैली पाहता कुख्यात दहशतवादी संघटना बोको हरामवर संशय व्यक्त केला जात आहे. बोको हरामच्या हिंसाचारात आतापर्यंत 20 हजार लोकांचा मृत्यू आणि 26 लाख लोक बेघर झाल्याची नोंद आहे. 

बातम्या आणखी आहेत...