आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नायजेरियन सैनिकांनी १५० आंदोलकांना केले ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आबुजा - नायजेरियन संरक्षण दलाच्या जवानांनी बियाफ्राच्या स्वातंत्र्यासाठी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करणाऱ्यांवर गोळीबार केला. यात १५० पेक्षा अधिक आंदोलक ठार झाले. मृतांची आकडेवारी अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने जाहीर केली. मात्र सैन्याने यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे याची १०० पेक्षा अधिक छायाचित्रे आणि ८७ व्हिडिआे क्लिपिंग्ज आहेत, असा दावा अॅम्नेस्टीने केला आहे. नायजेरियातील अॅम्नेस्टीचे कार्यवाहक मखमिद कमारा यांनी मृतांचा आकडा १५० पेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली.
अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा दावा आहे की, बियाफ्रा स्मृती दिवसाच्या वेळी मे २०१६ मध्ये सैन्याने आेनित्शामध्ये ६० लाेकांना गोळ्या झाडून ठार केले होते. एका महिलेने सांगितले की ती पतीसोबत फोनवर बोलत होती. त्या वेळी आपल्या पोटात पोलिसांनी गोळी झाडल्याचे त्याने फोनवर सांगितले. तिचा पती एका सैन्याच्या गाडीत होता. फोनवर गोळीबाराचे आवाज येत होते. दुसऱ्या दिवशी या महिलेच्या पतीचा गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह मिळाला.

१९७० पर्यंत गणराज्य
बियाफ्रा आंदोलक आग्नेय नायजेरियात बियाफ्रा स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. येथे बहुतांश इगबो समुदायाचे लोक आहेत. ५० वर्षांपूर्वी बियाफ्राच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून नायजेरियात गृहयुद्ध झाले होते. ३० मे १९६७ ते जानेवारी १९७० पर्यंत बियाफ्रा गणराज्य होते. त्या वेळी त्याला केवळ ४-५ देशांनी मान्यता दिली होती.
बातम्या आणखी आहेत...