आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्य देशात राहूनही मातृभाषा जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूळ नायजेरियातील असलेल्या जेमिसोला इसिमी या दोन मुलांसह ब्रिटनमध्ये राहतात. तिला केवळ मातृभाषा ‘योरुबा’च येते. मात्र, आपल्या मुलांनाही ही भाषा यावी, यासाठी तिची खटपट सुरू होती. मुलांना मातृभाषेतील निदान काही शब्द यावेत, यासाठी तिने ऑनलाइन व्हिडिओचा वापर केला, पण ते तेवढे प्रभावी वाटले नाही. मुलीला ही भाषा शिकवण्यासाठी कुणी प्रशिक्षकही मिळत नव्हते. अखेर मैत्रिणीच्या सल्ल्यावरुन तिने यूट्यूबच्या ‘कल्चर ट्री चॅनल’चा उपयोग केला. याद्वारे इसिमीच्या मुलांना योरुबा भाषा कळत आहे. या पद्धतीने भाषा शिकताना मुलांनाही आनंद मिळत आहे. याद्वारे मुलांना कमी वयात गॅजेटचा उत्तम वापर करायला मिळत आहे. यावर संगीत आणि कथांचा अधिक वापर असल्याने मुलांचे मूलभूत भाषिक ज्ञान पक्के होत आहे.
या चॅनलमुळे उच्चारही शिकता येत आहेत. तिच्या मुलांना या चॅनलद्वारे भाषिक खेळ खेळण्याची उत्तम सवय लागली आहे. या मुलांनी नर्सरीतील अनेक गोष्टी योरुबा भाषेत अनुवादित केल्या. अॅनिमेटरच्या मदतीने त्यांनी आपल्या भाषेत १५ व्हिडिओदेखील तयार केले आहेत.
}youtube.com
बातम्या आणखी आहेत...