आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: या चिमुकल्याने तयार केला मॅंगो आईस्क्रीम, Facebook ने दिले $2000

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सहा वर्षीय चिमुकल्याचे नाव निहाल राज ऊर्फ किचा (लाडके) आहे. चार वर्षांचा असल्यापासून त्याला कुकिंगची आवड आहे. या वयात त्याच्या एवढी मुले स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतात. पण त्याला मात्र कुकिंगचे वेड. कुकिंग त्याच्यासाठी एक फॅसिनेशन झाले आहे. त्याला अनेक डिशेस तयार करता येतात. या डिशेस तयार करण्यासाठी त्याचे काही सिक्रेट इनग्रेडीयंटही आहेत.
फेसबुकसाठी जाहिराती तयार करणाऱ्या कंपनीसाठी कास्टिंग करणाऱ्या एजन्सीने किचाचा आयस्क्रीम व्हिडिओ बघितला. त्यानंतर या व्हिडिओचे राईड्स मिळवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फेसबुकने तब्बल $2,000 त्याला दिले. म्हणजेच किचाला या व्हिडिओसाठी सुमारे एक ते सव्वा लाख रुपये मिळाले.
याबद्दल किचाचे वडील व्ही. के. राजागोपाल अभिमानाने सांगतात, की त्याची आई स्वयंपाक करायची तेव्हा तो स्वयंपाक खोलीत उभे राहून ती काय करते काय नाही हे बघायचा. एकदा आम्ही गंमत म्हणून त्याच्या कुकिंग रेसिपीचा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. आता त्याच्यासाठी युट्यूब चॅनल सुरु करावे, असा सल्ला माझे मित्र देत आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, याबाबत काय म्हणाला फेसबुक प्रवक्ता... बघा चिमुकल्या किचाचा रेसिपी व्हिडिओ.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...