आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाची विषारी सुई टोचून केली हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिओल- उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या साव‍त्र भावाची मलेशियात‍ हत्या करण्‍यात आली आहे. किम जोंग उनच्या भावाला विषारी सुई टोचून हत्या करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियातील एका न्यूज एजन्सीने केला आहे. मारेकर्‍यांनी किम यांच्या भावाच्या सुरक्षेतील उणीवांचा फायदा उचलत हत्या केल्याचे दक्षिण कोरिया सरकारने म्हटले आहे.

हत्येमागे उत्तर कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा हात? 
- किम जोंग उनच्या सावत्र भावाच्या हत्येचे वृत्त साउथ कोरियातील न्यूज एजन्सीने 'योनहाप'ने मंगळवारी प्रकाशित केले. 
- किम जोंग असे त्याचे नाव असून त्याच्या हत्येमागे उत्त‍र कोरियाच्या गुप्तचर संस्थेच हात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.   
- मलेशियाची राजधानी क्वालालंपूर एअरपोर्टवर त्याची हत्या करण्यात आली. 
- किम जोंग नाम याच्यावर विषारी सुईने हल्ला केल्याचे समोर आले आहे. 
- 'योनहाप'ने दावा केला आहे की, उत्तर कोरियाची गुप्तचर संस्था "द रेकन्नोयसां जनरल ब्यूरो"च्या हस्तकांनी किम जोंगची हत्या केली आहे. 
- दोन महिलांवर जाेंग नाम (45) याला विषारी सुई टोचल्याचा आरोप आहे.
- टीव्ही चॅनलने दावा कला आहे की, जोंग नामवर हल्ला करून दोन्ही महिला कारमधून फरार झाल्या.

मलेशियन पोलिस काय म्हणाले... 
- क्वालालंपूर एअरपोर्टचे पोलिस प्रभारी अधिकारी अब्दुल अजीज अली यांनी सांगितले की, सोमवारी एअरपोर्टवर एक कोरियन व्यक्ती सापडली होती. ती खूप आजारी होती. 
- एअरपोर्टच्या अधिकार्‍यांनी तिला हॉस्पिटलमध्ये हलवले, पण वाटेतच तिचे निधन झाले. 
- या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे अब्दुल अजीज अली यांनी सांगितले. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हुकुमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाचे फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...