आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प हे युद्धाचे व्यापारी, शांततेचे मारेकरी : उ. कोरिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयोंग- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे युद्धाचे व्यापारी आणि शांततेचे मारेकरी आहेत.  अमेरिकेतील शस्त्रास्त्र उत्पादकांच्या भरभराटीसाठी दक्षिण काेरिया आणि जपानला ट्रम्प प्रशासन शस्त्र विक्री करत आहे आणि कोरियाई भागात युद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. 

केसीएनए या उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यात ट्रम्प यांनी ५ सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटचा उल्लेख आहे. “जपान आणि दक्षिण कोरियाला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात  अत्याधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करण्यास आपण परवानगी देऊ,’ असे ट्रम्प यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले होते. उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे ट्विट केले होते. स्टॉकहोम इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, २०११ ते २०१५ दरम्यान अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे विकत घेणाऱ्यांमध्ये दक्षिण कोरियाचा चौथा क्रमांक आहे. 
 
अमेरिका- दक्षिण कोरिया नौदलाच्या संयुक्त सरावास प्रारंभ  : उत्तर कोरियाशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या लष्कराने कोरियाई बेटाजवळ १० दिवसांच्या संयुक्त नौदल सराव सत्राचे आयोजन केले आहे. यास सोमवारपासून सुरुवात झाली. अमेरिकी नौदलाची ७ वी तुकडी, वायुदल आणि दक्षिण कोरियाच्या नौदलाच्या या संयुक्त सरावाला “मेरिटाइम काऊंटर स्पेशल ऑपरेशन्स एक्सरसाइज’ असे नाव देण्यात आले आहे. यात क्षेपणास्त्रभेदी यूएसएस रोनाल्ड रिगनसहीत १५४ टॉमहाक क्रुझ मिसाइल आणि ४० युद्धनौकांचा समावेश अाहे.
 
ट्रम्प यांच्यावर बळजबरीचा आरोप; अभियान चमूला समन्स  
 अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपप्रकरणी ट्रम्प यांच्या अभियान चमूला समन्स बजावण्यात आले आहे.  “द अप्रेंटाइस’ या ट्रम्प यांच्या रिअॅलिटी  कार्यक्रमातील माजी स्पर्धक समर जेरवोस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. “ट्रम्प यांनी आपल्या मर्जीविना पकडून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अनेक खोटे आणि अवमानजनक वक्तव्य केले,’ असा आरोप जेरवोस यांनी केला आहे. ट्रम्प यांच्यावर ज्या ज्या महिलांनी गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत अशा सर्व महिलांशी संबंधित दस्तऐवज ट्रम्प यांच्या अभियान दलाने द्यावेत, असे या समन्समध्ये म्हटले आहे. शिवाय त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली होती यासंबंधीचे पुरावेही सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...