आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Change Of Cubean Migrants Policy, America Cleared

क्युबा स्थलांतरितांच्या धोरणात बदल नाही, अमेरिकेचे स्पष्‍ट संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - क्युबा स्थलांतरितांच्या धोरणात अमेरिका सरकार कोणताही बदल सद्य:स्थितीत तरी करणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. २० जुलैपासून अमेरिका-क्युबा संबंधांविषयीचे नवे धोरण जाहीर होणार आहे. १९६६ च्या कायद्यान्वये क्युबन स्थलांतरितांच्या नागरिकत्वासंबंधीच्या निर्णयाचा अधिकार अमेरिकेन अॅटर्नी जनरलला देण्यात आला होता. नागरिकांना अमेरिकेत प्रवेश द्यायचा वा नाही याविषयीचा निर्णयही अॅटर्नी जनरलकडेच देण्यात आला आहे. या कायद्यात सध्या कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. जुन्या कायद्याचीच पुढेही अंमलबजावणी होणार आहे.

दरम्यान, जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान क्युबन स्थलांतरितांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ५० वर्षांपासून उभय देशांत संवाद नव्हता. दोन्ही देशांतील ताणले गेलेले संबंध सर्वसामान्य होण्यासाठी थोडा अवधी लागेल. या दिशेने सतत प्रयत्न सुरू असल्याचे परराष्ट्र सूत्रांनी सांगितले.

५ क्युबन गुप्तहेरांची सुटका, फिडेल कॅस्ट्रोंनी घेतली भेट
हवाना । अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या कैदेत असणा-या ५ क्युबन गुप्तहेरांची सुटका करण्यात आली. त्यांची क्युबाला रवानगी करण्यात आली असून माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी या गुप्तहेरांची भेट घेतली. कॅस्ट्रो यांनी या गुप्तहेरांशी ५ तास चर्चा केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. १९९८ मध्ये अमेरिकन संरक्षण विभागाने त्यांना अटक केली होती. हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना कैदेत टाकण्यात आले होते. फिडेल यांचे या ५ जणांसोबतचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्‍यात अाले. दोन्ही देश परस्परांच्या कैद्यांची मुक्तता करत आहेत.