आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात भारतीयांशी असा केला जातो भेदभाव, घर मिळणेही कठिण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरमधील हा असा भाग, ज्याला लिटल इंडिया नावाने ओळखला जातो. - Divya Marathi
सिंगापूरमधील हा असा भाग, ज्याला लिटल इंडिया नावाने ओळखला जातो.
इंटरनॅशनल डेस्क- दक्षिण-पूर्व आशियाताली एक सुंदर आणि विकसित देश सिंगापूर आज आपला 52 वा स्वतंत्रता दिवस साजरा करत आहे. आधुनिक सिंगापूरची स्थापना 1819 मध्ये सर स्टेमफोर्ड रफल्स यांनी केली होती. यानंतर तेथे ब्रिटिशांची सत्ता राहिली. सिंगापूर 9 ऑगस्ट, 1965 रोजी स्वतंत्र झाला. जो आता पर्यटन व व्यापाराचे एक प्रमुख केंद्र म्हणून पुढे आले आहे. सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी लोक राहतात. मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की, तेथे भारतीय आणि चीनी लोकांना सहजासहजी घरे मिळत नाहीत. ऑनलाईन जाहिरातीत लिहले जाते.. ‘नो इंडियन्स, नो चायनीज’...
 
- मागील वर्षी आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील अनेक प्रॉपर्टी वेबसाईट्सने आपल्या जाहिरातीत स्पष्ट लिहले होते की, भारतीय आणि चायनीज लोकांनी संपर्क साधू नये. 
- अशाच पद्धतीच्या काही वेबसाईट्स ज्या घराचे भाडेकरू किंवा खरेदीदार भारतीय किंवा चायनीज असतील तर त्यांना ‘सॉरी’ म्हणत माघारी धाडले जाते.
- बीबीसीला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सुनील नावाच्या एका युवकाने सांगितले की, तो ब्रिटनमध्ये सुमारे 8 वर्षे राहिला. यानंतर तो नव्या नोकरीसाठी सिंगापूरमध्ये आला.
- जेव्हा तो सिंगापूरमध्ये पोहचला तेव्हा भाड्याने घर घेण्यासाठी त्याला काही आठवड्यांचा कालावधी लागला. 
- व्यवसायाने इंजिनियर सुनीलने सांगितले की, अनेक घरमालक सुरुवातीला त्याचे प्रोफेशन व भाषा ऐकून खूष दिसले पण नंतर त्यांना मी भारतीय असल्याचे सांगितले. लागलीच त्यांनी काही तरी कारणे सांगत घर भाड्याने नकार दिला. 
- अखेर सुनीलला घर भाड्याने घेण्यासाठी तेथील भारतीय वंशाच्या लोकांशी संपर्क साधावा लागला व त्याला कसे बसे घर मिळाले.
 
घाणेरडे असतात चीनी- भारतीय लोक-
 
- सुनीलने जेव्हा भारतीय लोकांना घर का नाकारले जाते तेव्हा त्याला इस्टेट एजंटांनी सांगितले की, भारतीय लोक स्वच्छ व नीटनेटके राहत नाहीत. 
- तसेच घरही चांगले सांभाळत नाहीत, घर स्वच्छ ठेवत नाहीत. भाड्याचे घर असल्याने ते कसेही वापरतात व मेंटेनन्सवर लक्ष ठेवत नाहीत. 
- याशिवाय एजंटने आणखी एक मोठे कारण सांगितले ते म्हणजे भारतीय तसेच चीनी लोक जेवणात, भाज्यात खूप मसाले, तेल वापरतात त्यामुळे घरे तेलकट होतात व त्याला कुबट असा वास येत राहतो. 
- सिंगापूरची लोकसंख्या सुमारे 56 लाख असून 90 टक्के घरे स्थानिक लोकांची आहे. मात्र, राहणा-यांची संख्या परदेशातील लोकांची जास्त आहे. येथे सुमारे 10 टक्के भारतीय राहतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिंगापूरचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...