आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचे ‘ब्लॅकमेलिंग’ चालणार नाही, एका हातात शस्त्र ठेवून चर्चा अशक्य- भारताने घेतला समाचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - पाकिस्तानने स्वत:च ‘दहशतवादी राष्ट्र’ असल्याचे एक प्रकारे कबुल केले आहे. दहशतवाद हे पाकचे धोरणच बनले आहे. परंतु एका हातात शस्त्र बाळगून चर्चा होऊ शकत नाही. असे ‘ब्लॅकमेलिंग’ आम्हाला चालणार नाही, असे भारताने निक्षून सांगितले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रात केलेले भाषण भारताने तत्काळ फेटाळताना त्यांच्या सर्व मुद्द्यांचा समाचार घेत त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडला.

आमसभेत शरीफ यांनी हिजबुलचा कमांडर बुरहान वानीवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावर परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर म्हणाले, शरीफ आणि पाकिस्तान दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करू लागला आहे. वानीचे उदात्तीकरण करून त्यांनी पाकिस्तान दोषी असल्याचे तोंडाने कबूल करून टाकले आहे. खरे तर शरीफ यांचे भाषणच मुळात धक्कादायक आहे. वानीच्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून आेळखले जाते. असे असूनही पाकिस्तानकडून मात्र त्यांचा बचाव केला जात आहे. भारत चर्चेसाठी तयार आहे, परंतु एका हातात शस्त्र व दुसरीकडे चर्चेचे नाटक योग्य नाही. हे ब्लॅकमेलिंग आहे. ते अमान्य आहे, असे अकबर म्हणाले. त्यांच्या वीस मिनिटांच्या भाषणात काश्मीरवर अधिक भर होता. दरम्यान, ८ जुलै रोजी वानीचा खात्मा झाला होता. त्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, निदर्शने सुरू आहे. वानीला काश्मीरच्या स्वातंत्र्याचे प्रतीक बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. त्याला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.
पुढे वाचा..
> बलूच नेता बुगतींचा राजकीय आश्रयासाठी भारताकडे अर्ज
> भारताने १९५१ च्या करारावर स्वाक्षरी केली नव्हती
> ब्रह्मदग बुगती कोण आहेत
> काय घडू शकते
बातम्या आणखी आहेत...