आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Place For Intolerance In India, Prime Minister Narendra Modi Says In UK

गांधी-बुद्धाच्या देशात असहिष्णुता नामंजूर, लंडनमध्ये बोलले मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- असहिष्णुतेच्या मुद्द्यावर मौन बाळगल्याच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लंडनमध्ये उत्तर दिले. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांच्याशी १० -डाऊनिंग स्ट्रीट येथे झालेल्या द्विपक्षीय भेटीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, भारत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे. आमच्यासाठी प्रत्येक छोटी घटना गंभीर असते. आम्ही कोणत्याही घटनेला सहन करत नाही. न्यायव्यवस्था कठोरतेने कारवाई करत आहे आणि यापुढेही करत राहील.

कॅमरून यांच्याशी मोदी यांनी चर्चेच्या वेळी संयुक्त वक्तव्य केले आहे. यानंतर प्रश्नांना उत्तर देताना मोदी यांनी म्हटले की, समाजातील मूलभूत मूल्यांच्या विरोधात भारत कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करत नाही. ही गोष्ट आमच्या रक्तात भिनलेली आहे. सव्वाशे कोटी लाेकांच्या देशात ही घटना फार महत्त्वाची आहे किंवा नाही याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, परंतु प्रत्येक घटना गंभीर आहे. भारत एक वाईब्रंट डेमोक्रेसी आहे. येथे संविधानानुसार सामान्यांहून सामान्य नागरिकांच्या जीवनात प्रत्येक प्रकारची सुरक्षा, त्याच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

आजमहाराणी देईल भोजन वेम्बलेत होईल संबोधन
बकिंघमपॅलेस येथे शुक्रवारी महाराणी एलिझाबेथ यांनी मोदी यांच्या स्वागताप्रीत्यर्थ भोजन ठेवले आहे. यानंतर मोदी वेम्बले स्टेडियमच्या जवळ ८० हजार प्रवासी भारतीयांना संबोधित करतील.

पुढील स्लाइडवर वाचा, ब्रिटिश संसदेत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व सर्वाधिक चर्चेतील मुद्दे...