आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात छोटे यंत्र बनवणाऱ्या तिघांना रसायनचे नोबेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टाॅकहोम - जगातील सर्वात छोटी लिफ्ट, कृत्रिम मांसपेशी आणि सर्वात छोटी मोटार बनवणाऱ्या तीन वैज्ञानिकांना या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. फ्रान्सचे ज्याँ पियरे सॉवेज, ब्रिटनचे सर जे. फ्रेजर स्टोडार्ट आणि नेदरलँडचे बर्नार्ड एल. फेरिंगा हे ते तीन शास्त्रज्ञ आहेत. नियंत्रित करता येऊ शकतील, असे अणू तयार करण्यात त्यांना यश आले आहे. त्यांचा हा श ोध लहान रोबो आणि कृत्रिम अवयव यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तिघांना ८० लाखो क्रोनाचा (सुमारे ६.१८ कोटी रुपये) पुरस्कार विभागून मिळेल.

आण्विक मोटार बनवणारे बर्नार्ड फेरिंगा हे पहिलेच व्यक्ती आहेत. त्यांनी १९९९ मध्ये मॉलेक्युलर रोटर ब्लेड बनवली होती, ती एकाच दिशेने फिरत होती. या शास्त्रत्रांच्या शोधाला नॅनो मशीन किंवा नॅनोबोट असेही संबोधण्यात आले. नोेबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे की, १८३० च्या दशकात ज्याप्रमाणे विजेची मोटार बनवली होती तसाच हा मॉलेक्युलर मोटारचा शोध आहे. त्यावेळी लोकांना माहीत नव्हते, पण त्याद्वारेच वॉशिंग मशीन, पंखे आणि फूड प्रोसेसर बनवण्यात आले आणि ते चालले. मॉलेक्युलर मोटारचा उपयोग नव्या वस्तू, सेन्सर आणि ऊर्जा साठा प्रणालीत होऊ शकेल.
बातम्या आणखी आहेत...