आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगावरील उपचाराऐवजी 90 वर्षीय नोर्मा यांची जगभ्रमंती सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ९० वर्षांच्या नोर्मो जग प्रवासावर निघाल्या आहेत. विशेष म्हणजे कर्करोग असतानाही त्यांनी हे धाडस केले आहे. त्यांना आजाराची कसलीच भीती नाही. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या लिहितात, "वय कितीही झाले तरी लोकांनी प्रवास करायला घाबरू नये.' त्यांच्या पोस्टला १ लाख लाइक्स आणि १५०० कमेंट मिळाल्या आहेत. १७०० वेळा पोस्ट शेअर करण्यात आली. मिशिगनच्या रहिवासी नोर्मो म्हणाल्या, जगप्रवास करणे हे आपले स्वप्न होते. मात्र, आयुष्यातील धावपळीत ९० वर्षे जमले नाही. गेल्या ऑगस्टमध्ये पतीचे निधन झाले. यानंतर दोन दिवसांनी गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यांना रुग्णालयात नेले मात्र, त्यांनी उपचार करून घेण्यास नकार दिला.
डॉक्टर म्हणाले : चांगले आहे, स्वप्न जगा : नोर्माे यांनी मुलीला सांगितले, "आता माझ्या आयुष्याचा भरवसा नाही. कर्करोगावर मात केली तरी किती दिवस जगेन सांगता येत नाही. त्यामुळे माझे स्वप्न सत्यात उतरवू इच्छिते.' विशेष म्हणजे डाॅक्टरांनीही त्यांच्या निर्णयाला विरोध केला नाही. शस्त्रक्रिया, किमोथेरपी, किरणोत्सर्ग आणि अनेक उपचार करावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतरही आजार बरा होण्याची शाश्वती नाही.
कारमध्ये मुलगा-सून आणि डॉगी रिंगोचीही सोबत
यानंतर सप्टेंबरमध्ये नोर्मा यांनी प्रवासास सुरुवात केली. सुरुवातीस युरोप आणि चीनमधील अनेक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने पाहिली. हॉट एअर बलूनच्या उड्डाणातील आनंद त्यांनी लुटला. सध्या त्या अमेरिकेच्या प्रवासावर आहेत. मोठ्या सी कारमध्ये त्यांच्यासोबत मुलगा टीम, सून रॅमी आणि श्वान रिंगो आहे. या कारमध्ये व्हीलचेअरसारखी आवश्यक सुविधा आहे. सून म्हणाली, आता आम्ही थांबणार नाहीत. आम्हाला त्यांचा प्रत्येक क्षण संस्मरणीय करायचा आहे.