Home »International »Other Country» Normous Iceberg Has Turned Ferryland Into A Tourist Spot

टायटॅनिकला धडकलेल्या हिमनगापेक्षा मोठा हिमनग पोहचला या समुद्रकिनारी, PHOTOS साठी लोकांच्या उड्या

दिव्यमराठी वेब टीम | Apr 22, 2017, 09:39 AM IST

  • कॅनडातील फेरीलंडजवळ समुद्रात सुमारे 150 फूट ऊंचीचा नजरेत पडलेला बर्फाचा हिमनग (आईसबर्ग)
इंटरनॅशनल डेस्क- कॅनडातील फेरीलंडजवळ समुद्रात सुमारे 150 फूट ऊंचीच्या बर्फाचा हिमनग (आईसबर्ग) नजरेत पडला. त्यामुळे या छोट्या शहरात पर्यटकांची तुडूंब गर्दी झाली. लोक धडाधड त्याचे फोटो काढू लागले. तसेच त्याच्यासमोर उभे राहून फोटो काढू लागले. गर्दी एवढी झाली की तेथे ट्रॅफिक जाम झाले. हा आईसबर्ग त्या कुख्यात आईसबर्गपेक्षा ऊंच आणि मोठा आहे, ज्याने टायटॅनिक जहाज बुडवले होते. जाणून घ्या काय आहे प्रकरण...
- कॅनडातील पूर्वेकडील किना-यावर न्यूफाउंडलंडपासून लेब्राडोर प्रांत यांच्यादरम्यान भागाला आईसबर्ग व्हॅली म्हटले जाते.
- या ठिकाणी दरवर्षी 600 पेक्षा जास्त आईसबर्ग तरंगताना दिसतात.
-फेरीलंडजवळ तरंगताना दिसलेल्या या आईसबर्गची चर्चा जास्त झाली कारण हा हिमनग खूपच मोठा होता.
- येथील महापौर ऐडन कावानाघ म्हणतात की, या भागात आतापर्यंत पाहिलेला सर्वात मोठा हा हिमनग आहे.
- विशेष म्हणजे हे हिमनग समुद्र किना-यावर तरंगत येतात. हा आईसबर्ग समुद्रकिना-यावर इतका जवळ आला होता की, तेथे जाऊन लोक फोटो काढत होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बर्फाळ हिमकडाचे फोटोज...

Next Article

Recommended