सेऊल - दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांमध्ये पुन्हा युद्धजन्य स्थिती निर्माण झाली असून, शनिवारी सकाळी उत्तर कोरियाने मोठी मिलिट्री ड्रिल केली. दरम्यान, सीमेपलीकडून फायरिंगचा आवाज येत असल्याने दक्षिण कोरियाचे सैन्यदेखील सजग झाले असून, त्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांनी हल्ल्याची तयारी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिन्यापूर्वी द. कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेऊन लॉन्ग रेंज मिसाइल लॉन्च केली. एवढेच नाही तर 1987 आणि 2010 मध्ये त्याने द. कोरियावर हल्लासुद्धा केला होता.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतीसंबंधी केले अपमानस्पद वक्तव्य
- द. कोरियाच्या एका लष्कर अधिकाऱ्याने सांगितले, शनिवार सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी बॉम्बस्फोट आणि फायरिंगचा आवाज आला.
- वेस्टर्न आयलॅण्ड बेंगयोंगच्या लोकांना अनाउंसमेंटच्या माध्यमातून ड्रिलची सूचना दिली गेली; परंतु आयलँड खाली केला नाही.
- नंतर काहीच तासांत उ. कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने द. कोरियाचे राष्ट्रपती यांच्या बाबत अपमानस्पद आणि आक्षेपार्ह शब्द वापरले.
तणाव वाढला
- शेजारील राष्ट्रावर हल्ला करावा, असा आदेश हुकूमशाह किम जोंग उन याने दिल्याचे दोन दिवसांपूर्वी वृत्त आले होते.
- उ. कोरियाने घेतलेल्या हायड्रोजन बॉम्ब आणि मिसाइल चाचणी नंतर दोन्ही देशाच्या सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- वृत्तात म्हटले, '' किम जोंग उन यांच्या आदेशानंतर उ. कोरियाच्या स्पाय एजेंसीने सायबर आणि इतर हल्ले करण्याची तयारी सुरू केली.
- उ. कोरियाने आतापर्यंत द. कोरियाच्या डोळ्यांत धूळ फेकून हल्ला केल्याचा इतिहास आहे.
- 2010 मध्ये त्याने द. कोरियावर गोळबारी केली होती. त्यावेळी चार लोकांचा मृत्यू झाला होता.
- 1987 मध्येही द. कोरियाच्या एका प्रवासी विमानावर हल्ला करून 115 लोकांना ठार केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...