न्युयॉर्क / प्योंगयोंग - आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करून मिलाइल टेस्ट घेणाऱ्या उत्तर कोरियाने आता दर आठवड्याला क्षेपणास्त्र चाचणी घेणार असे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर अमेरिका युद्धाची परिस्थिती निर्माण करत असेल तर लष्करी कारवाई सुद्धा करू अशी धमकी उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्या इशाऱ्यावर त्यांची ही प्रतिक्रिया आहे.
दर आठवड्याला मिसाइल टेस्ट, युद्धासाठी तयार
- अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी उत्तर कोरियाला अफगाणिस्तानवर टाकलेल्या मदर ऑफ ऑल बॉम्ब हल्ल्यापासून शिकण्याचा सल्ला दिला होता.
- उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री हान सोंग रियोल यांनी सांगितल्याप्रमाणे, "आमचा देश मिसाईल टेस्ट बंद करणार नाही, तर उलट आता आठवड्यातून एक क्षेपणास्त्र चाचणी घेणार आहे. आमचे अण्वस्त्र आमच्या सुरक्षेसाठीच आहेत."
- उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रातील (यूएन) उप-राजदूत यांनी अमेरिकेच्या विरोधात पारंपारिक आणि अण्स्त्र अशा दोन्ही प्रकारच्या युद्धासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच अमेरिकेने युद्धाची परिस्थिती निर्माण केल्यास अमेरिकेवर लष्करी कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला.
चीनने दिला शांततेचा सल्ला
अमेरिका आणि उत्तर कोरियात वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने या दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर बसून तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या आठवड्यात चीनने ही प्रतिक्रिया दिली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)