आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियाने पुन्हा जपानच्या दिशेने डागले मिसाइल, प्रत्येक देश क्षेपणास्त्राच्या टप्प्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरियाने पुन्हा जपानच्या दिशेने आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल सोडल्याचे बुधवारी समोर आले आहे. ह्वासाँग असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. उत्तर कोरियाने 75 दिवसांत या मिसाइलची चाचणी घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी किम जोंग उनच्या लष्कराने जपानच्या दिशेने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले होते. अमेरिकेने दिलेल्या माहितीप्रमाणे, उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात जगातील जवळपास प्रत्येक देश आला आहे. 

 

- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी उत्तर कोरियाच्या ICBM चाचणीस अधिकृत दुजोरा दिला. हे मिसाइल जगातील सर्वात शक्तीशाली आंतरखंडीय मिसाइल्सपैकी एक आहे असेही ते पुढे म्हणाले. 
- उत्तर कोरियाच्या ह्वासाँग क्षेपणास्त्राच्या टप्प्यात जगातील प्रत्येक देश आला आहे. या क्षेपणास्त्राने किम जोंग उन आता कुठल्याही देशावर हल्ला करू शकतो असा इशारा अमेरिकेने दिला. 
- उत्तर कोरियाचे अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक मिसाइल प्रकल्प जगासाठी घातक आहेत. उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्र, चीन, युरोप आणि अमेरिकेसह अनेक देशांचे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. तरीही उत्तर कोरिया वारंवार निर्बंध धुडकावून या चाचण्या घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...