आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाने पुन्हा डागली 3 क्षेपणास्त्रे; संबंध बिघडतील; कोरियाचा चीनला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- उत्तर कोरियाने सोमवारी आपल्या पूर्व किनाऱ्यावरून तीन बॅलेस्टिक (खंडीय) क्षेपणास्त्रे डागली. जी -२० शिखर संमेलनाच्या वेळी द. कोरियाई लष्कराच्या कार्यालयाने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण उत्तर कोरियाची राजधानी प्यांगाँग येथून भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता केले गेले. क्षेपणास्त्राची अधिक माहिती तर मिळाली नाही. मात्र हे क्षेपणास्त्र एक हजार किलोमीटर दूर समुद्रात जाऊन पडले. तो समुद्र जपानच्या सागरी सीमेत येतो.

या प्रक्षेपणापूर्वीच काही वेळ चीनच्या होंगझोऊ शहरात सुरू असलेल्या जी-२० शिखर संमेलनात चीन आणि द. कोरियाच्या अध्यक्षांमध्ये बैठक झाली होती. बैठकीत द. कोरियाचे राष्ट्रपती पार्क जिन हे यांनी सांगितले होते की, उत्तर कोरियाद्वारे केल्या जात असलेल्या क्षेपणास्त्र अणुचाचण्यांचा द. कोरिया चीनच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे द. कोरियाने चीनकडे यापूर्वीही हे मत मांडले होते. दरम्यान, अमेरिकेनेही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध केला असून त्या देशाने संयम राखावा, असे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...