आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Kim Jong Kills Chief Architect Over Airport Terminus Design

उत्तर कोरिया: एअरपोर्टचे डिझाईन आवडले नाही, हुकूमशहाने आर्किटेक्टला ठार मारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयांग (उत्तर कोरिया)- प्योंगयांग एअरपोर्टच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन होण्यापूर्वी नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग याने एअरपोर्टच्या चीफ आर्किटेक्ट मा वोन यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किम जोंगला एअरपोर्टचे डिझाईन आवडले नव्हते. कोरियन सेंट्रल न्युज एजंसीने गेल्या आठवड्यात नवीन टर्मिनल बघायला गेलेला किम आणि त्याच्या पत्नीचे फोटो प्रसिद्ध केले होते. पण यात मा वोन दिसले नव्हते. गेल्या वर्षापासून मा वोन यांच्यासह नॉर्थ कोरियाचे सहा टॉप डिप्लोमॅट्स अचानक गायब झाले आहेत. किमने त्यांची हत्या केली असल्याचे सांगितले जाते.
का ठार मारले
द डिप्लोमॅट या वेबसाईटने माहिती दिली, की किम जोंग याच्या अपेक्षेप्रमाणे टर्मिनल तयार करण्यात मा वोन अयशस्वी झाले होते. किमने त्यांना भ्रष्टाचार आणि आदेश न पाळण्याचा आरोपाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ठार मारल्याचे वृत्त आहे. एका दुसऱ्या मीडिया रिपोर्टनुसार, टर्मिनलचे बांधकाम सुरु झाले तेव्हाच किमने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर डिझाईनमध्ये बदल करण्यात आले होते. त्यानंतर मा वोन यांना डिझायनिंग डिपार्टमेंट ऑफ नॅशनल डिफेंस कमिशनच्या पदावरुन हटविण्यात आले.
जुने टर्मिनल विदेशी पर्यटकांसाठी परिपूर्ण नव्हते, असे किमचे म्हणणे होते. नवीन टर्मिनल जुन्याच्या तुलनेत तब्बल सहा पट मोठे आहे. यात ज्वेलरी शॉप, कॅफे आदी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. येथून चीन आणि रशियासाठी विमाने उड्डाण करतील.
किमने डिझाईनवर जाहीर केली होती नाराजी
एका न्युज एजंसीत दिलेल्या माहितीनुसार, टर्मिनलच्या डिझाईनवर किमने आधीच नाराजी व्यक्त केली होती. यावेळी किम म्हणाला होता, की टर्मिनल-2 च्या निर्माण कार्यातील अखेरच्या टप्प्यात काही कमकुवत बाजू समोर आल्या आहेत. वास्तू सौंदर्याची कल्पना समजावून सांगण्यात डिझायनर अपयशी ठरले आहेत. कोणत्याही डिझाईनमध्ये देशाची प्रतिमा उमटावी. प्रत्येक वास्तू कलेचा हा आत्मा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, नवीन टर्मिनल बघण्यासाठी पत्नीसोबत पोहोचला किम जोंग...