आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह लावले, किम यांनी आत्याला विष पाजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी आपली आत्या किम क्योंग हुई यांना विष पाजून ठार मारले. पतीच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे एवढीच त्यांची चूक होती. हा दावा उत्तर काेरियातून पळून आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

क्योंग या िकम जाँग यांच्या बहीण होत्या. किम जाँग इल यांच्या मृत्यूनंतर किम जाँग उन हुकूमशहा बनले. त्या वेळी क्योंग यांचे पती जाँग सोंग थाएक हे त्यांचे मार्गदर्शक होते; परंतु नंतर थाएक अधिक शक्तिशाली होत असल्याचेे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी निर्वस्त्र करून भुकेल्या कुत्र्यांसमोर फेकण्यात आले होते. त्यावर थाएक यांच्या पत्नीने सवाल केला होता.
गेल्या वर्षी पाच किंवा सहा मे रोजी आत्याची हत्या करण्याचे आदेश दिले होते. याबद्दलची माहिती केवळ अंगरक्षक इकाई-९७४ यास होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मात्र क्योंग यांचा पती निधनाची बातमी ऐकून हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे वृत्त पसरवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...