आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा होता उत्तर कोरियात स्थापना दिनाचा जल्लोष, समोर आले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशोधक आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत सुप्रीम लीडर किम... - Divya Marathi
संशोधक आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत सुप्रीम लीडर किम...
इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा राष्ट्र उत्तर कोरिया आपल्या नव्या अण्वस्त्र चाचणीमुळे पुन्हा चर्चेत आहे. ही उत्तर कोरियाची सहावी अणु चाचणी होती. हुकूमशहा किम जोंग उन या चाचणीला पाचव्या चाचणीप्रमाणेच हायड्रोजन बॉम्ब टेस्ट म्हणत आहे. नेहमीच गुप्त राहणाऱ्या या देशात एक वेगळेच जग आहे. या देशात जाणाऱ्या पर्यटक किंवा पत्रकारांना सुद्धा छायाचित्रे काढण्याची परवानगी नाही. क्वचितच हा देश आपल्या उत्सवांचे आणि सामान्य आयुष्याचे फोटोज शेअर करतो. अशात उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था केसीएनएने देशाच्या 69 स्थापना दिनाचे फोटोज जाहीर केले. त्यामध्ये नागरिकांसह हुकूमशहा किम जोंग उन सुद्धा जल्लोष करताना दिसून आला आहे. 
 
 
- केसीएनएकडून जाहीर करण्यात आलेले फोटोज किम इल-सुंग स्क्वेअर परिसरात एकवटलेल्या नागरिकांचे आहेत. 9 सप्टेंबर रोजी ते सगळे एकत्रित येऊन जल्लोष करत होते.
- यात तानाशहा किम जोंग उन आपल्या वैज्ञानिक आणि लष्करी अधिकाऱ्यांसह अतिशय आनंदी मूडमध्ये दिसत आहे. 
- ‘पीपल्स थिएटर’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात किमसह वैज्ञानिक आणि लष्करी अधिकारी सुद्धा उपस्थित होते. 
- सेरेमनीच्या या छायाचित्रांमध्ये किम जोंग उनची पत्नी रि सोल जू सुद्धा दिसत आहे. 
 
 
पुढील स्लाइड्समध्ये पाहा... जल्लोषाचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...