आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानी जलक्षेत्रात, अमेरिकेला शह देण्यासाठी क्षेपणास्त्र डागले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेेऊल /टोकियो - उत्तर कोरियाने बुधवारी प्रथमच जपान समुद्रात जपानी वर्चस्वाखालील जलक्षेत्रांत क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. जपानचे संरक्षणमंत्री जनरल नाकातानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एक क्षेपणास्त्र जपान समुद्राच्या उत्तर सागरकिनाऱ्यापासून २५० किलोमीटर अंतरावरील विशेष आर्थिक क्षेत्रात पडल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जपान व उत्तर कोरियादरम्यान तणाव निर्माण झाला आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी माध्यमांना याविषयी माहिती दिली. देशाच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका आहे. उत्तर कोरियाची ही चाचणी संतापजनक असून जपान त्याला सडेतोड उत्तर देईल, असे अॅबे म्हणाले. उत्तर कोरियाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:५० वाजता या चाचण्या घेतल्याचे अमेरिकेच्या सैन्य सूत्रांनी सांगितले. पैकी एक क्षेपणास्त्र प्रक्षेपित होताच हवेतच स्फोट झाला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांचे हे उल्लंघन असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या तैनातीचे सडेतोड उत्तर आपण देणार असल्याचा इशारा यापूर्वी उत्तर कोरियाने दिला होता. अमेरिकेने ही प्रणाली दक्षिण कोरियात तैनात केली आहे. जपानने १९९८ मध्ये आपल्या पूर्व किनाऱ्यावर विशेष आर्थिक क्षेत्राची निर्मिती केली होती. त्यानंतर प्रथमच उत्तर कोरियाने येथे क्षेपणास्त्रे डागली आहेत. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून तो देश चाचण्या करत आहे.
जपानी जलक्षेत्राच्या पार डागले होते क्षेपणास्त्र
यापूर्वी जपानचे विशेष आर्थिक क्षेत्र त्याच्या पश्चिम किनाऱ्यालगत प्रशांत महासागरात होते. उत्तर कोरियाने १९९८ मध्ये क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. त्या वेळी या जपानी क्षेत्राला पार करून हे क्षेपणास्त्र जलक्षेत्रात पडले होते. त्यानंतर जपानने पूर्व किनाऱ्यावर विशेष आर्थिक क्षेत्र विकसित केले. याच्या लगतच उत्तर कोरियाचा सागरी किनारा आहे.
बातम्या आणखी आहेत...