आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • North Korea Preparing Long Range Missile Test, Says Japanese Report

लॉन्ग रेंज मिसाइल टेस्ट करणार नॉर्थ कोरिया? हुकुमाशहाने दिली USला धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो/प्योंगयांग- अणुबॉम्बपेक्षाही अधिक संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची नुकतीच यशस्वी चाचणी घेतलेल्या उत्तर कोरियाने लॉन्ग रेंज मिसाइलची निर्मिती केल्याचा दावा जपानने केला आहे. कोरिया लवरच लॉन्ग रेंज मिसाइल लॉन्च करणार असल्याचेही जपानच्या सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेला टार्गेट केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी अमेरिकेवर हल्ला करण्‍याची धमकी देखील दिली आहे.

पुढील आठवडयात लॉन्चिंग?
- जपानमधील 'क्योदो न्यूज एजन्सी'च्या एका अधिकार्‍याने सांगितले की, उत्तर कोरिया पुढील आठवड्यात लॉन्ग रेंज मिसाइल लॉन्च करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-उत्तर कोरियाची टोंगचेंग री मिसाइल टेस्ट साइटची सॅटेलाइट इमेजेसची शहानिशा केल्यानंतर जपानने हा दावा केला आहे.
- यूएन सेक्युरिटी काउंसिलने उत्तर कोरियावर नवे निर्बंध घालण्याची तयारी सुरु केली आहे.
- सहा जानेवारीला नॉर्थ कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली होती.
- दरम्यान, उत्तर कोरियाच्या न्यूक्लियर प्रोग्रामवर यूएनने कठोर निर्बंध घातले आहेत.
- नॉर्थ कोरियाने 2012 मध्ये अंतिम यशस्वी लॉन्ग रेंज रॉकेट लॉन्च केले होते.

'नॉर्थ कोरियन मिसाइल'चे मूळ सुपरपॉवर...
- 'नॉर्थ कोरियन मिसाइल'चे मूळ वर्ल्ड सुपरपॉवर असल्याचे म्हटले जात आहे. नॉर्थ कोरियन मिसाइला अमेरिकेतील काही भाग, भारत, चीन, रशिया व जपानपर्यंत सहज पोहोचू शकते.

नॉर्थ कोरियाकडे आहेत हे मिसाइल...
- टॅपोडोन्ग, मुसुदन व नोडोन्ग


टॅपोडोन्ग मिसाइल
- नॉर्थ कोरियाने आतापर्यंत टॅपोडोन्ग-1 व टॅपोडोन्ग-2 देखील विकसित केले आहे. टॅपोडोन्ग-2 ची मारक क्षमता 10,000 किलोमीटर अंतर आहे.
- याचा अर्थ असा की, नॉर्थ कोरिया जगातील अनेक देशांवर बॉम्ब टाकू शकतो.
- रिपोर्ट्सनुसार, 4 जुलै 2006 मध्ये टॅपोडोन्ग-2 मिसाइल टेस्ट अयशस्वी ठरले होते.

टॅपोडोन्ग मिसाइलच्या निशाण्यावर कोण?
- नॉर्थ कोरियापासून यूएस - 10,337 किलोमीटर अंतरावर
- नॉर्थ कोरियापासून भारत - 5,064 किलोमीटर अंतरावर
- नॉर्थ कोरियापासून रशिया - 2,790 किलोमीटर अंतरावर
- नॉर्थ कोरियापासून जपान - 1,043 किलोमीटर अंतरावर

पुढील स्लाइडवर वाचा, मुसुदन व नोडोन्ग मिसाइलबाबत...