आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या घातक जहाजालाही बाॅम्बने उडवू शकतो! उत्तर कोरियाची अमेरिकेला युद्धाची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयांग/सेऊल- अमेरिकेचे लढाऊ जहाज कोरियाच्या समुद्राकडे रवाना होताच मंगळवारी उत्तर कोरियाने अमेरिकेला थेट युद्धाचाच इशारा देऊन टाकला आहे. अमेरिकेच्या घातक “कार्ल विन्सन’ जहाजावरही आम्ही बॉम्ब टाकू शकतो, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. 

कार्ल विन्सन हे लढाऊ विमान वाहून नेणारे विध्वंसक जहाज असून ते गतीने कोरियाच्या दिशेने रवाना झालेले आहे. दुसरीकडे चीनने उत्तर कोरियाच्या सीमेवर दीड लाख लष्करी जवान तैनात करून टाकले आहेत. तर, उत्तर कोरियाने त्यांची अणुचाचणी थांबवावी यासाठी दबाव टाकण्यासाठी चीनने कोरियात विशेष दूतही पाठवला आहे. उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले, अमेरिकेची अशीच इच्छा असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारे युद्ध करण्यास तयार आहोत. 

युद्धास अमेरिकाच जबाबदार राहील. पहिल्यांदा हल्ला करण्याची एकाधिकारशाही आपल्याकडे आहे असे अमेरिकेने समजू नये. आम्हीसुद्धा हल्ला करू शकतो, असेही अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, उत्तर कोरियाच्या सुप्रीम पीपल्स काँग्रेसची बैठक मंगळवारी सुरू झाली. आगामी १५ एप्रिल रोजी उत्तर कोरिया नव्या आण्विक कार्यक्रमाची घोषणा करण्याची शक्यता त्यावरून वर्तवली जाते. १५ एप्रिल रोजी उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांची जयंती आहे. दरम्यान, चीनने कोरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. चाचणी केल्यास अमेरिकाा मदत करू, असा इशारा चीनने दिला आहे. 

अन्यथा आम्हीच प्रश्न सोडवू : ट्रम्प
उत्तर कोरियाचा प्रश्न सोडवण्यासाठी चीन सोबत आले तर उत्तमच, अन्यथा हा प्रश्न एकहाती सोडवला जाईल चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांच्याशी गेल्या आठवड्यात माझी चर्चा झाली. अमेरिकेसोबत चांगला व्यापार हवा असल्यास उत्तर कोरियाचा प्रश्न निकाली काढा,असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

उ. कोरियाच्या वर्तमानपत्रात सिरिया राष्ट्राध्यक्षांची जाहिरात  
उत्तर कोरियातील ‘रोदोंग सिनमुन’ या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मंगळवारी पानभरून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यात सिरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांच्याकडून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने सिरियावर केलेल्या हल्ल्याबाबत उन यांनी तीव्र टीका केली होती आणि राष्ट्रपती असद यांना पाठिंबा जाहीर केला होता.
बातम्या आणखी आहेत...