आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside North Korea : 15 फोटोंवरून जाणून घ्या या देशाची स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यालू नदीच्या किनाऱ्यावर सिनुइजीमध्ये पोलिसांबरोबर कोरियन महिला. - Divya Marathi
यालू नदीच्या किनाऱ्यावर सिनुइजीमध्ये पोलिसांबरोबर कोरियन महिला.
प्योंगयाँग - जगासाठी नेहमीच गूढ ठरलेल्या उत्तर कोरियाने आता पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येथील हुकूमशहा किम जोंग उन यांचे सरकार देशाच्या पर्यटन व्यवसायात काही बदल करण्याच्या तयारीत आहे. 2020 पर्यंत वर्षभरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 20 लाखांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा उद्देश आहे. येथे येणारे बहुतांश पर्यटक शेजारी असलेल्या चीनमधील असतात. पण आता पाश्चिमात्य देशांतील पर्यटकांची संख्याही वाढत आहे.

सध्या अनेक टूर कंपन्या नॉर्थ कोरियासाठी विविध पॅकेजेस देतात. त्यात संपूर्ण देश फिरता येतो. या पॅकेजेसमध्ये 'सर्फ इन बीच' टूरपासून ते 'बिझनेस इंटरेस्ट' टूर पर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यात बहुतांश पॅकेजेस हे 'सी इट ऑल' आहेत. त्यात एका आठवड्याच प्योंगयाँग आणि त्याच्या आसपासचा परिसर फिरता येतो.

कोर्यो हॉटेल प्रसिद्ध
कोरियाला आलेल्या अनेक पर्यटकांनी सांगितले की, येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था कोर्यो हॉटेलमध्ये केली जाते. दोन टॉवर असलेली ही 45 मजली इमारत प्योंगयाँगमध्ये तायदेंग नदीच्या एका बेटावर तयार करण्यात आली आहे. येथे गिफ्ट शॉप, रेस्तरॉ आणि एक गॅम्बलिंग रूम आहे. पण येथील रेस्तरॉमध्ये शक्यतो कोणी दिसत नाही. पर्यंटकांनी एकटे कुठेही जाऊव नये म्हणून, रात्रीच्या वेळी बेटाला ममुख्य मार्गाशी जोडणारा पूल बंद केला जात होता.

वाहतुकीसाठी बसचा वापर
प्योंगयाँग बाहेर कार या अपवादानेच आढळतात. येथे लोक मोठ्या प्रमाणावर बसचाच वापर करतात. त्यापैकी अनेक बस तर 1960 च्या दशकातील आहेत. मुख्य चौकांमध्ये महिला वाहतूक पोलिस असतात. त्यांची नजर काही खास गाड्यांवरही असते. चौकातून सरकारी लायसन्स प्लेट असणारी कार जातात त्या सॅल्यूट करतात. येथे मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

फोटो घेण्यास मनाई
पर्यंटकांना प्योंगयाँगमध्ये सगळीकडे फोटो काढता येत नाही. शहराच्या मध्यभागी दुसरे किम संग स्क्वेअर हे देशातील सर्वात प्रसिद्ध लैंडमार्क आहे. येथे मिलिट्री परेड होते आणि दरवर्षी वार्षिक सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येत नागरिक जमतात. उत्तर कोरिया सुरुवातीपासूनच हर्मिट किंगडम (स्वतःबद्दल सत्य लपवणारा देश) म्हणून ओळखला गेला आहे. मानवाधिकारासी संबंधित गुन्हे, लेबर कँप, दुष्काळ आणि किम कुटुंबाच्या अत्याचारांचा देश अशी या देशाची ओळख आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, उत्तर कोरियाचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...