Home »International »Other Country» North Korea Said US Will Be Made To Pay With A Hail Of Fire

ट्रम्प यांनी युद्धाची ठिणगी टाकली, आमचे सैन्य त्यांना शिक्षा देईल; उत्तर कोरिया

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेविरुद्ध प्रखर शब्दांत भूमिका मांडली आहे. परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी म्हटले आहे

वृत्तसंस्था | Oct 13, 2017, 01:48 AM IST

  • उत्तर कोरियाने अमेरिकेला नव्याने धमकावले आहे.
प्योंगयांग-उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिकेविरुद्ध प्रखर शब्दांत भूमिका मांडली आहे. परराष्ट्र मंत्री री योंग हो यांनी म्हटले आहे की, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाविरुद्ध युद्धाची ठिणगी उडवून चिथावणीखोर वृत्तीचे दर्शन दिले. यावर आता केवळ युद्धातूनच तोडगा निघू शकतो. केवळ चर्चेतून सोडवण्याचा हा मुद्दा नाही. आमच्या देशाचे सैन्य युद्धखोर अमेरिकेला आता शिक्षा देईल. याची सुरुवात ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या भडक आणि चिथावणीखोर भाषणातून केली होती. संयुक्त राष्ट्रावर टीका करत री योंग म्हणाले की, संयुक्त राष्ट्राला आपली प्रतिमा चांगली ठेवायची असेल तर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. संयुक्त राष्ट्र नाहक त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

उ. कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग हो यांचे हे वक्तव्य रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था असलेल्या तासने जारी केले आहे. याशिवाय री योंग यांनी आपल्या देशाच्या अण्वस्त्रांना न्याय्य म्हटले आहे. अमेरिकेपासून स्वत:चे रक्षण करण्याइतकी अण्वस्त्रसज्जता आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले.
अमेरिकी युद्ध विमानांचे उ. कोरियाच्या क्षेत्रात उड्डाण
मंगळवारी रात्री उशिरा अमेरिकी वायुदलाच्या युद्ध विमानाने उ. कोरियाच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण केले. ही कवायत सुरू असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उ. कोरियाच्या मुद्द्यावर संरक्षण अधिकाऱ्यांशी बोलत होते.
उ. कोरियाच्या ८ महिन्यांत २२ क्षेपणास्त्र चाचण्या
उ. कोरियाने फेब्रुवारी २०१७ पासून आतापर्यंत १५ क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. यात २२ क्षेपणास्त्रे वापरण्यात आली. जपानवरून दोन क्षेपणास्त्र चाचण्या त्यांनी घेतल्या.
उ. कोरियाचा प्रश्न तडीस नेणे गरजेचे : डोनाल्ड ट्रम्प
उ. कोरियाचा प्रश्न घातक झाला असून त्याला तडीस नेणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या आेव्हल कार्यालयात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासह पत्र परिषद घेतली. ट्रम्प यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. इतरांपेक्षा मी अधिक निश्चयी आणि दृढ आहे. मी सर्वांची मते ऐकून घेणारा आहे. मात्र, अमेरिकेच्या हितासाठी निर्णय घेईल. हा निर्णय जगासाठीदेखील योग्य असेल. कारण युद्धखोर वृत्ती ही जागतिक समस्या आहे. पूर्वीच हा प्रश्न सुटायला हवा होता.

Next Article

Recommended