सेऊल- उत्तर कोरियाने आपल्या ताज्या अाण्विक चाचणीचे समर्थन केले आहे. परंतु मध्य पूर्वेतील दोन माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन आणि कर्नल मुअम्मर गद्दाफी यांची गत काय झाली हे जगाने पाहिले. त्यावरून धडा घेत आम्ही अणुबॉम्ब तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तर काेरियाने म्हटले आहे.
दोन्ही हुकूमशहांनी चूक केली होती. जगाच्या सांगण्यावरून दोघांनी अणुबॉम्बची महत्त्वाकांक्षा साेडली होती.
आम्ही त्या मार्गावरून जाणार नाहीत. म्हणूनच दक्षिण कोरियाने प्रदेशाला युद्धाच्या खाईत लोटू नये, असे उत्तर कोरियाने सुनावले आहे. दक्षिण कोरियाने सरहद्दीवर उत्तर कोरियाच्या दिशेने तोंडकरून भोंगे लावले आहेत. त्यावरून उत्तर कोरियाच्या विरोधात अपप्रचार केला जात आहे.
अणुबॉम्ब हीच मजबूत तलवारइतिहास काही वेगळे सांगतो. अणुबॉम्बची क्षमता असलेल्या देशांकडे हल्लेखोर पाहू शकत नाहीत. त्यांच्याविरूद्ध लढण्यासाठी अणुबॉम्ब हीच मजबूत तलवार आहे. त्यामुळे कोणीही हल्ला करू शकत नाही, असे उत्तर कोरियाने म्हटले.