आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर, आण्विक युद्ध अटळ; किमला ठार मारण्याचा कट रचतेय अमेरिका, नॉर्थ कोरियाचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रात उत्तर कोरियाचे उप-राजदूत किम इन रेयोंग - Divya Marathi
संयुक्त राष्ट्रात उत्तर कोरियाचे उप-राजदूत किम इन रेयोंग
इंटरनॅशनल डेस्क - संयुक्त राष्ट्रात उत्तर कोरियाचे उप-राजदूत किम इन रेयोंग यांनी अमेरिकेला नव्याने धमकावले आहे. कोरियन महाद्वीपांवर सुरू असलेल्या सध्याच्या हालचाली पाहता आण्विक युद्ध अटळ असल्याचे दिसून येते. उत्तर कोरियाच एकटा राष्ट्र आहे, ज्याला सारे जग घातक म्हणत आहे. प्रत्यक्षात, उत्तर कोरियाला सुद्धा आपल्या संरक्षणासाठी अण्वस्त्र बनवण्याचा हक्क आहे. 
 

किम जोंगला ठार मारण्याचा कट रचतेय अमेरिका...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी (अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून) मोठ्या प्रमाणात युद्ध सराव घेतला जातो. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि अणुबॉम्ब सुद्धा चाचणीसाठी वापरले जातात. असे संयुक्त राष्ट्रच्या समितीपुढे रेयोंग यांनी आरोप केले आहेत. 
- "अमेरिका आमचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांना आपल्या गुप्तहेरांच्या माध्यमातून ठार मारण्याचे कटकारस्थान रचत आहे. ही गोष्ट खऱ्या अर्थाने सर्वात घातक आहे."
- ""उत्तर कोरियाने आपला अणु कार्यक्रम गुंडाळला आहे. आता आम्ही हा एक शक्तीशाली देश बनला आहे. आमच्या विरोधात कारवाई केल्यास किंवा आमच्या नेत्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास आमच्या अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि आंतरखंडीय मिसाइल्सचा सामना करावा लागेल."
- "समस्त अमेरिका आमच्या क्षेपणास्त्रांच्या पल्ल्यात आहे. अमेरिका एक इंचही पुढे सरकत असेल तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील."
 
बातम्या आणखी आहेत...