आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्थ कोरियाची म्युझिक डिप्लोमसी, हुकूमशहाने चीनला पाठवला गर्ल्स बँड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुकूमशहा किमने त्याचा प्रायव्हेट गर्ल्स बँड ‘मोरानबोंग' चीनला पाठवला आहे. - Divya Marathi
हुकूमशहा किमने त्याचा प्रायव्हेट गर्ल्स बँड ‘मोरानबोंग' चीनला पाठवला आहे.
प्योंगयांग - दोन देश संबंधातील कटुता दूर करण्यासाठी सहसा पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि स्पोर्टस् डिप्लोमेसीची मदत घेतात. पण नॉर्थ कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची विचार पद्कीधती वेगळी आहे. त्यांनी चीन या शेजारी राष्ट्रामध्ये या कामासाठी बँड गर्ल्स पाठवल्या आहेत. त्याला स्पाइस गर्ल्स डिप्लोमसी म्हटले जात आहे.

किम जोंगने का पाठवला गर्ल्स बँड?
- हुकूमशहा किमने त्याचा प्रायव्हेट गर्ल्स बँड ‘मोरानबोंग' एका आठवड्यासाठी चीनला पाठवला आहे.
- गेल्या काही वर्षांमध्ये चीनबरोबरच्या नात्यांत आलेला दुरावा कमी करण्यासाठी त्यांनी असे केले आहे.
- या बँडमध्ये सहभागी तरुणी त्यांचे हास्य आणि कलेने चिनी अधिकारी आणि मंत्र्यांचे हृदय जिंकतील अशी त्यांना आशा आहे.
- याच आठवड्यामध्ये युनायटेड नेशन्स सेक्युरिटी काऊन्सिलमध्ये नॉर्थ कोरियामध्ये होणाऱ्या ह्युमन राइट्स व्हॉयलेशनवर चर्चाही होणार आहे.
- ह्युमन राइट्स अॅक्टीव्हीस्टना अशी आशा आहे की, सेक्युरिटी काऊन्सिल जोंग यांना इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टात पाठवणार आहे.
- त्यामुळेच जोंग यांनी चीनमध्ये स्पाइस गर्ल्स डिप्लोमसी सुरू केली आहे.
- यामुळे चीन त्यांच्या विरोधात नरमाईची भूमिका घेण्यासाठी राजी होईल, अशी त्यांना आशा आहे.
- जोंग यांना हेही माहिती आहे की, चीन व्हिटोचा वापर करून त्यांच्या विरोधात होणारा कोणताही निर्णय थांबवू शकतात.

केव्हा आली होती, नात्यात कटुता?
- 2011 मध्ये किम जोंग यांनी सत्ता सांभाळल्यानंतरपासून चीन आणि उत्तर कोरियाच्या नात्यात कटुता आली होती.
- चीनने नॉर्थ कोरियाहून येणाऱ्या रिफ्युजींच्या विरोधातही कठोर भूमिका घेतली होती.

स्वतः निवडल्या बँड मेंबर्स
- या प्राइव्हेट बँडमध्ये असलेल्या मेंबर्सना 2012 मध्ये जोंगने स्वतः निवडले होते.
- बँडने सुरेल गाण्यांच्या जोरावर काही दिवसांतच जोंग यांच्यावर जादू केली होती.

केवळ अधिकाऱ्यांसाठी शो
- चीनमध्ये सामान्य जनतेला बँडच्या कॉन्सर्टची मजा लुटता येणार नाही.
- त्यात केवळ चीनचे निवडक सरकारी अधिकारी आणि नेते सहभागी होतील.
- कोरियाची सरकारी वृत्तसंस्था केसीएनएच्या मते, ‘मोरानबोंग जगभरातील प्रसिद्ध स्टायलिश बँड आहे. त्यातून नॉर्थ कोरियाचे कल्चर आणि आर्ट पाहायला मिळते. आमची मैत्री अधिक दृढ करणे हा यामागचा उद्देश होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...